मराठी मालिकांमधील बाल कलाकारांचे खरे वय आणि नाव

मराठी मालिकांमधील बाल कलाकारांचे खरे वय आणि नाव

आजकाल अनेक मराठी मालिका या छोट्या पडद्यावर सुरु आहेत. या मालिकांमध्ये बाल कलाकारांना देखील खूप मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक मालिकांमध्ये आपल्याला बाल कलाकार दिसताहेत. अनेक जणांना या बाल कलाकारांची खरे वय व नाव माहीत नसते. आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबद्दलच माहिती देणार आहोत.

1) मायरा वायकूळ – माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सर्वात महत्वाची भूमिका साकारणारी परीने केली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने सर्व प्रेक्षकांच्या मनात तिने महत्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. तसेच असे म्हटले जाते की, माझी तुझी रेशीमगाठ मालिका फक्त परीसाठी पाहिली जाते.

परीचा गोंडस अभिनय व नाजूक आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक केवळ टीव्हीसमोर सर्व काम सोडून बसलेली असतात, असेही म्हटले जाते. परीचे खरे नाव मायरा वायकुळ असून ती अवघ्या पाच वर्षांची आहे.

2) अवनी जोशी – दुसऱ्या क्रमांकावर येते ती अवनी जोशी. अवनी अवघ्या आठ वर्षांची आहे. अवनी हिने देखील अतिशय जबरदस्त असे काम अनेक मालिका आणि काही चित्रपटातही केलेले आहे. तिच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करत असतात.

3) विरळ माने– टोन्या हा देव माणूस सीजन टू मध्ये काम करत आहे. त्याचे खरे नाव विरळ आहे. हा केवळ दहा वर्षांचा आहे. विरज याने देखील अनेक मालिकांमध्ये देखील काम केलेले आहे. तसेच आगामी काही काळात त्याच्याकडे काही प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येते.

4) स्पृहा साळवी – स्पृहा हिने देखील अनेक मालिका आणि काही चित्रपटातही काम केले आहे. सध्या ती पिंकी चा विजय असो या मालिकेत आपल्याला दिसत आहे पिंकी चा विजय असो या मालिकेतील ची भूमिका अतिशय जबरदस्त होत्या साकारत आहे सुरुवातीचे वय केवळ सध्या सहा वर्षाचे आहे.

5) स्वरा जोशी – स्वरा जोशीचे वय अकरा वर्ष आहे. स्वरा जोशी हिने देखील अनेक मालिका आणि काही शोमध्ये काम केले आहेत आता देखील आगामी काळात तिच्याकडे अनेक मालिका असल्याचे बोलले जात आहे.

6) स्पृहा दळी – रंग माझा वेगळा मालिकेत ती दीपिकाच्या भूमिकेत दिसत आहे. तिचे नाव स्पृहा दळी असून तिचे वय केवळ आठ वर्षाचे आहे आहे.

7) हर्षद नायबळ – पिंकीचा विजय असो या मालिकेत दिप्या दिसत असून त्याचे खरे नाव हर्षद नायबळ असे आहे तो केवळ सहा वर्षांचा आहे. हर्षद याच्याकडे देखील अनेक मालिका आणि चित्रपट असल्याचे सांगण्यात येते.

Team Beauty Of Maharashtra