बघा या मराठी अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्यातले पार्टनर !

सध्या अनेक मराठी वाहिनींवर अनेक मालिका सुरू आहेत. या मालिकेत अनेक कलाकार हे काम करत आहेत. या कलाकारांचे कुटुंबीय, खरे जोडीदार कोण आहेत याबाबत माहिती जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. आज आम्ही आपल्याला या वाहिन्यांवर सुरू असलेल्या अनेक मालिकांमधीव अभिनेत्रींच्या खऱ्या जोडीदाराबद्दल माहिती देणार आहोत.
१) मधुरणी प्रभुलकर – मधुराणी प्रभुलकर ही आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधतीची भूमिका साकारत आहे. तिची भूमिका अतिशय जबरदस्त झालेली आहे. तिच्या पतीचे नाव प्रमोद प्रभुलकर असे आहे.
२) रेश्मा शिंदे – रेश्मा शिंदे ही सध्या आपल्याला रंग माझा वेगळा या मालिकेत काम करताना दिसत आहे. रेश्मा शिंदेचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव अभिजीत चौगुले असे आहे.
३) सायली देवधर – सायली देवधर ही सध्या आपल्याला लग्नाची बेडी या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये तिची सिंधू ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तिच्या भूमिकेचे सगळेजण कौतुक देखील करत आहेत. सिंधू म्हणजे सायली देवधर हिच्या पतीचे नाव गौरव बुरसे असे आहे.
४) माधवी निमकर – सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये माधवी निमकर ही अतिशय जबरदस्त भूमिका साकारताना दिसत आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तिने शालिनी वहिनी या भूमिकेला जबरदस्त न्याय दिला आहे. माधवी हिचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव विक्रांत कुलकर्णी असे आहे.
५) ज्ञानदा रामतीर्थकर – सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत आपल्याला अप्पूच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. ज्ञानदा हिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. रियल लाईफ मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर ही सिंगल आहे.
६) रेवती लेले – लग्नाची बेडी या मालिकेमध्ये रेवती लेले हिने मधु ही भूमिका साकारली आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. रेवती लेले ही सध्या आदिश वैद्य याला डेट करत असून लवकर ते दोघे लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
७) गिरीजा प्रभू – सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरजा प्रभू. गिरजा प्रभू हिने या मालिकेमध्ये गौरीची भूमिका साकारली आहे. रियल लाईफ मध्ये गौरी ही सध्या सिंगलच आहे.