सरळसाध्या अरुंधतीचे अचानक बदललेले रुप पाहून आशुतोष झाला आवाक?

सरळसाध्या अरुंधतीचे अचानक बदललेले रुप पाहून आशुतोष झाला आवाक?

आई कुठे काय करते मधील अरुंधती म्हणजेच मधुराणी ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, असे म्हणायला हरकत नाही. या मालिकेत पारिवारिक नातेसंबंधांविषयी कथानक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई मुलांसाठी नेमके काय करू शकते हे दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

साधी भोळी आई असे आपले गणित असते. परंतु या मालिकेत अरुंधतीने साधेपणापासून ते स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यापर्यंतची झुंज या मालिकेत दाखवली आहे. अरुंधती ही झुंज यशस्वीपणे लढत असल्याचे दाखवत असल्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. तिचे अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी होत आहे.

जे अनिरुद्धने लग्नाच्या पंचवीस वर्षात होऊ दिले नसते. परंतु जेव्हा अनिरुद्ध व अरुंधतीचा घटस्फोट होतो, त्यानंतर अरुंधती चे आयुष्य बदलते. ती स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे ठरवते. अनघा तिला मदत करते. एका आश्रमात अरुंधती नोकरी करायला लागते. तिथे ती दीपोत्सवाच्या कार्यक्रमात गाणे गाते.

यावेळी तिची एका व्यक्तीशी ओळख होते. ती व्यक्ती म्हणजे अशुतोष असतो. आशुतोष आणि अरुंधती हे महाविद्यालयाचे मित्र असतात. परंतु या संदर्भात अरुंधतीला काहीच आठवत नसते. आशुतोष मात्र तिला ओळखतो. अरुंधती आशुतोष ला ओळखत नाही. देविका तिला ओळख पटवून देते.

आशुतोष अरुंधती कडून अल्बम साठी गाणे गाण्याचे ठरवतो. याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट साईन केले जाते ,ती नियमाने रियाज देखील करायला लागते. ही गोष्ट अनिरुद्ध ला खटकते अनिरुद्ध म्हणतो काय आहे तुझ्या गाण्यात ज्यामुळे तुला तो इतका भाव देत आहे? असा प्रश्न अनिरुद्ध अरुंधती ला विचारतो. अरुंधती म्हणते की, गेली पंचवीस वर्ष तुम्ही हेच केले आहे.

मी आता स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारच आहे. आता कोणीही मला रोखू शकत नाही असे म्हणते. अरुंधती यशस्वीपणे आपले गाणे रेकॉर्डिंग करते. सध्या या मालिकेत एक नवीन वळण येणार आहे. येणाऱ्या काही भागांमध्ये अनिरुद्ध व कांचन अरुंधती तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. म्हणून ती समृद्धी बंगला म्हणजे देशमुख कुटुंबीयांसोबत राहणार नाही, असा सर्वांसमोर निर्णय सांगते.

याचा प्रोमो देखील व्हायरल झालेला आहे. तो खूप चर्चेत आहे. कारण अरुंधती आता बदललेली आहे. अरुंधती आता पूर्णपणे बदलली आहे. आई कुठे काय करते या मालिकेत आईची भूमिका साकारत असताना अरुंधती हिने साडी परिधान केलेली साधी अशी दाखवण्यात आली आहे.परंतु अरुंधती आता साडीमध्ये नाही तर ड्रेसमध्ये दिसणार आहे.

मालिकेत सध्या नवे वळण आपल्याला बघायला मिळणार आहे ,ते म्हणजे अरुंधती साडीत नाही तर पंजाबी ड्रेसमध्ये दिसणार आहे. येणाऱ्या भागात अरुंधतीचे हे बदलते रुप पाहायला मिळणार आहे. अरुंधतीला तिच्या या नव्या रुपात पाहिल्यानंतर आशुतोष तर आश्चर्यचकीत झाला आहे. अरुंधती समोर येताच तो तिच्याकडे एकटक पाहू लागतो.

व्हिडीओच्या सुरुवातीला अरुंधती आशुतोषला केक भरवताना दिसते. त्यानंतर अनिरुद्धचा फोन येतो आणि तो‌ मुलाला विचारतो की, अरुंधती आहे का तिथे? त्यावर अंकल आणि आंटी कधीच गेले झोपायला बेडरुममध्ये.

हे उत्तर ऐकल्यानंतर अनिरुद्धचा संताप अनावर होतो.

Team Beauty Of Maharashtra