एप्रिल महिन्यात 13 वेळा चंद्र बदलणार राशी, जाणून घ्या शुभ-अशुभ योगाची स्थिती

एप्रिल महिन्यात 13 वेळा चंद्र बदलणार राशी, जाणून घ्या शुभ-अशुभ योगाची स्थिती

राशीमंडळात प्रत्येक ग्रहाचं असं अस्तित्व आहे. त्यामुळे कोणताही ग्रह छोटा किंवा मोठा नाही. कारण प्रत्येक ग्रह आपल्या स्वभानुसार फळं देत असतो. त्यात गोचर कालावधीत एखाद्या ग्रहासोबत युती आघाडी झाली तर शुभ अशुभ योग जुळून येतात. चंद्र हा सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह आहे. त्यामुळे इतर ग्रहांसोबत युती आघाडी होतच असते. एप्रिल 2023 या महिन्यात चंद्र ग्रह 13 वेळा गोचर करणार आहे. 2 एप्रिलला पहिलं गोचर असेल आणि 29 एप्रिलला शेवटचं गोचर असणार आहे. चला जाणून घेऊयात गोचर आणि योगांची स्थिती…

चंद्र गोचर एप्रिल 2023
2 एप्रिल 2023 रोजी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत सध्या कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्नच येत नाही. सकाळी 4 वाजून 48 मिनिटांनी हा प्रवेश असेल.

4 एप्रिल 2023 रोजी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी हा प्रवेश असेल. कन्या राशीत इतर ग्रह नसल्याने कोणताच योग जुळून येत नाही.

7 एप्रिल 2023 रोजी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी हा प्रवेश असेल. तूळ राशीत केतू ग्रह असल्याने चंद्राच्या आगमनाने ग्रहण योग तयार होईल. हा अशुभ योग मानला जातो.

9 एप्रिल 2023 रोजी चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनी हा प्रवेश असणार आहे. त्यामुळे शुभ अशुभ योगाची स्थिती नसेल.

11 एप्रिल 2023 रोजी वृश्चिक राशीतून चंद्र धनु राशीत प्रस्थान करेल. दुपारी 12 वाजून 58 मिनिटांनी या राशीत सव्वा दोन दिवसांसाठी ठाण मांडेल. धनु राशीतही तसा कोणताच ग्रह नाही.

13 एप्रिल 2023 रोजी चंद्र धनु राशीतून मकर राशीत विराजमान होईल. संध्याकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी या राशीत बसणार आहे. मकर राशीतही सध्या कोणताच ग्रह नाही. त्यामुळे शुभ अशुभ युतीचा प्रश्न येत नाही.

15 एप्रिल 2023 रोजी चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रस्थान करेल. संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी हा प्रवेश असेल. त्यामुळे या राशीत असलेल्या शनिदेवांसोबत युती होईल. या युतीला ज्योतिषशास्त्रात विष योग म्हंटलं जातं. त्यामुळे अशुभ परिणाम दिसून येतील.

17 एप्रिल 2023 रोजी चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत रात्री 8 वाजून 51 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. त्यामुळे गुरुच्या सान्निध्यामुळे गजकेसरी योग जुळून येईल. सव्वा दोन दिवस हा योग असणार आहे.

19 एप्रिल 2023 रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत राहु, बुध, सूर्य आधीच ठाण मांडून असतील. त्यानंतर 22 एप्रिलला गुरु ग्रहाची एन्ट्री होईल. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती असेल. राहुसोबत युतीमुळे ग्रहण योग असेल. तर गुरुसोबतच्या युतीमुळे गजकेसरी योग जुळून येईल. चंद्र सूर्याची युती अशुभ फळ देईल.बुध चंद्र योगाला राजयोग म्हंटलं जातं.

22 एप्रिल 2023 रोजी चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. सकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी चंद्र या राशीत प्रवेश करेल. या राशीत चंद्र आणि शुक्राच्या युतीमुळे कलात्मक योग तयार होईल.

24 एप्रिल 2023 रोजी चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल.दुपारी 1 वाजून 12 मिनिटांनी हा प्रवेश असणार आहे. या राशीत कोणताच ग्रह नाही. त्यामुळे शुभ अशुभ युती असं काहीच नसेल.

27 एप्रिल 2023 रोजी चंद्र मिथुन राशीतून स्वरास असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. मध्यरात्री 12 वाजून 18 मिनिटांनी हा प्रवेश असेल. कर्क राशीत मंगळ ग्रह असणार आहे. चंद्र आणि मंगळाच्या युतीला लक्ष्मी योग संबोधलं जातं.

29 एप्रिल 2023 रोजी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत सध्या कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्नच येत नाही. दुपारी 12 वाजून 47 मिनिटांनी हा प्रवेश असेल.

Team BM