या सुप्रसिद्ध ‘बॉलिवूड’ अभिनेत्रीची आई आहे मराठी, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री वर तिची आई

या सुप्रसिद्ध ‘बॉलिवूड’ अभिनेत्रीची आई आहे मराठी, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री वर तिची आई

बॉलीवुड आणि मराठी चित्रपट सृष्टी यांचे फार जुने नाते आहे. अनेक कलाकार असे आहेत की ज्यांचे मूळ मराठी आहे. आणि त्यानंतर त्यांनी हिंदी अभिनेतासोबत लग्न केले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला अभिनेत्री काजोल हिच्या आईचे घेता येईल. काजोल हिची आई तनुजा ही मराठी आहे. काजोलच्या आईने म्हणजेच तनुजा यांनी बंगाली व्यक्ती सोबत लग्न केले आहे.

त्यामुळे काजोल हिच्या घरामध्ये आपसूकच मराठी संस्कार आहेत. त्यामुळे काजोल देखील मराठी बोलत असते. याच प्रमाणे अजय देवगन देखील मराठी मध्ये संभाषण साधत असतो. त्याचप्रमाणे दिग्दर्शक रोहित शेट्टी याची पत्नी देखील मराठी आहे. त्यामुळे रोहित शेट्टी याच्या चित्रपटात बहुतांश कलाकार हे मराठी असतात. मराठीचे त्याचे हे विशेष प्रेम आहे. अक्षयकुमार सुद्धा चांगल्या प्रकारे मराठी बोलू शकतो.

काही वर्षांपूर्वी लीना चंदावरकर या मराठी अभिनेत्रीने किशोर कुमार यांच्या सोबत लग्न केले होते. मराठी आणि हिंदी हा इतिहास खूप जुना आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये मराठी माणसाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत काही वर्षांपूर्वी आवाज उठवला होता. त्यानंतरच मराठीचा बोलबाला आता हिंदीत दिसत आहे. नाहीतर काही वर्षांपूर्वी मराठी कलाकार म्हटले की, ते हिंदी चित्रपटात नोकराची भूमिका करायचे.

मात्र, आता जसा काळ बदलत आहे तसा मराठीला हिंदी चित्रपटात न्याय भेटत आहे. रोहित शेट्टी याच्या सिंघम या चित्रपटात त्याची भूमिका ही मराठी दाखवण्यात आली. मात्र, चित्रपट हिंदीत असल्यामुळे हा चित्रपट प्रचंड चालला होता.आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की ही अभिनेत्री देखील मूळ मराठी शी निगडित आहे. या अभिनेत्रीचं नाव रूपाली आहे.

रुपली गांगुली आणि दिग्गज अशी अभिनेत्री आहे. गाजत असलेल्या अनुपमा या मालिकेत ती चांगली भूमिका साकारत आहे. ही मालिका प्रचंड चालत आहे. रूपाली गांगुलीच्या आईचे नाव रजनी आहे. रजनी या मराठी आहेत. रजनी यांनी काही वर्षांपूर्वी अनिल गांगुली यांच्या सोबत लग्न केले होते. रूपालीचा भाऊ विजय हादेखील दिग्दर्शक आहे. रूपाली गांगुली हिने आशिष वर्मा याच्यासोबत 2013 मध्ये लग्न केले होते. अनुपमा ही मूळ बंगाली मालिकेवर आधारित आहे. या मालिकेवर आधारित आई कुठे काय करते ही मराठी मालिका बेतलेली आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra