अंकिता नंतर आता ‘या’ मेन अभिनेत्रीने सोडली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका; प्रेक्षकांना धक्का

काही दिवसापूर्वी आई कुठे काय करते’ या मालिकेत अंकिताची भूमिका साकारत असलेली राधा सागर हिने आई कुठे काय करते ही मालिका सोडली आहे. सध्या आपणास अनेक मालिकांची नवीन साखळी पहावयास मिळत आहे.
नवीन मालिका येत असल्या तरी आई कुठे काय करते ही मालिका मात्र अनेकांना आवडते. या मालिकेने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ही मालिका सध्या लोकप्रिय झाली आहे. काही दिवसापूर्वी राधा सागर हिने या मालिकेतून एक्झिट केले आहे. अंकिता ही या मालिकेत अभिषेक सोबत लग्न करून देशमुख कुटुंबीयांच्या घरात आलेली असते.
परंतु तिचे सत्य समोर आल्यावर तिला देशमुख कुटुंबातून बाहेर काढले जाते. त्यानंतर अभिषेकचे अनघा सोबत लग्न झाल्याचे आपण पाहिले आहे. राधा सागर हिने ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोडली त्याऐवजी आता ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत झळकत आहेत. आई कुठे काय करते या मालिकेत एकापाठोपाठ एक पात्र मालिका सोडताना दिसत आहेत.
केदार विशाखाचा नवरा याने देखील ही मालिका सोडली आहे. कधीतरी तो एखाद्या एपिसोडमध्ये या मालिकेत दिसतो. त्यानंतर अविनाशची बायको हिनेदेखील ही मालिका सोडली आणि झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत ती आपणास दिसत आहे. आता यानंतर अजून एका अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे.
ही अभिनेत्री अरुंधतीची खूप खास मैत्रिणी या मालिकेत दाखवली आहे. अरुंधतीच्या सुख दुःखात नेहमी ती अरुंधती सोबत असते. आजीला तिचा खूप राग येत असतो. आजी नेहमी ती कामावर उशिरा आली म्हणून काढून टाका, असे सारखे बजावत असते. आपल्याला लक्षातच आले असून नेमके कोणी ही मालिका सोडली आहे
विमलने आई कुठे काय करते ही मालिका सोडली आहे. विमल या मालिकेद्वारे घराघरात पोहोचली होती. विमल आपल्या भाषाशैलीमुळे अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. या मालिकेत विमलची भूमिका अभिनेत्री सीमा घोगले हिने साकारली आहे. परंतु सीमाने देखील ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
विमल ही संजनाला बिलकुल आवडत नसते. संजनाची आणि विमलची सतत कटकट होत असते. संजना अरुंधतीची जागा कधीच घेऊ शकत नाही, असे विमल सातत्याने तिलाच सुनावत असते. दरम्यान, सीमा भोगले आता ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेत दिसणार असून तिच्यासोबत सोनल पवार ही मराठमोळी अभिनेत्री देखील दिसणार आहे.
त्यामुळे आता आई कुठे काय करते या मालिकेमध्ये विमलचे पात्र यापुढे प्रेक्षकांना दिसणार नसल्याचे सांगण्यात येते, तर आपल्याला विमलची भूमिका आवडत होती का? हे आम्हाला नक्की सांगा.