‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मध्ये अनिल चं सत्य येणार जयदीप समोर

‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मध्ये अनिल चं सत्य येणार जयदीप समोर

सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका नवीन वळण घेऊन आली आहे. गौरी सर्व कुटुंबातील सदस्यांशी ज्याप्रकारे वर्तणूक करत आहे त्यामुळे सर्व जण आश्चर्यचकित आहेत. त्यातच गौरी जयदीप चा मोबाईल चेक करताना जयदीप पाहतो आणि तिला विचारतो हे काय करत आहेस.

तितक्याच शालिनी वहिनी येऊन तिला माईंनी बोलवले आहे असे सांगतात. माईंकडे गौरी जाते. शालिनीला देखील माई आणि गौरीला एकत्र काय प्लॅन करत आहेत हे पाहायचे आहे. गौरी व माईला शालिनीला एकत्र पकडायचे असते परंतु हे काही शालिनी कडून साध्य होताना सध्यातरी दिसत नाही.

शालिनी वहिनी गौरीचा नेमका काय प्लॅन आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात दिसत आहे. जयदीप म्हणजेच मंदार सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याने एक व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला आहे आणि खास असे कॅप्शन देखील त्याला दिले आहे. काय आहे नेमका व्हिडिओ त्यातील माहिती जाणून घेऊयात …

स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आता रंजक वळणावर आहे. गौरी माईच्या साथीने जयदीप असा का वागला याचे नक्की कारण काय हे शोधत आहे ,तर गौरीला शालिनी मानसी आणि अनिल चे सत्य कधी समजणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

त्यातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होताना दिसतोय ज्यामध्ये अनिल गौरी चा गळा आवळतो आणि जयदीप अनिलवर हल्ला करून मानसी कडे रागाने बघतो तेव्हा नक्की काय प्रकरण आहे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हा व्हिडिओ सुख म्हणजे नक्की काय असतील मधील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे. त्यांनी आमच्याशी पंगा घ्यायचा नाही, घेईल तो टिकायचं नाही. असे कॅप्शन दिले आहे .मानसी आणि अनील चे सत्य लवकरच गौरी व जयदीप समोर येणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हे पाहणे महत्त्वाचे ठरेल कि पुढे मालिकेमध्ये काय होणार आहे.

Team Beauty Of Maharashtra