धक्कादायक ! …म्हणून अमृता खानविलकर पतीपासून राहते वेगळी, स्वतः केला याबाबत खुलासा

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी झाला आहे. अमृता हिचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे. तिच्या आईचे नाव गौरी खानविलकर आहे, तर वडिलांचे नाव राजीव खानविलकर आहे. तिला एक मोठी बहिण असून तिचे नाव आदिती खानविलकर आहे.
सुरुवातीला अमृता हिचे शिक्षण मुंबईला झाले. त्यानंतर ती मुंबईतच राहत आहे. काही जाहिराती आणि मॉडेलिंग केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यात त्यानंतर तिने काही मालिकादेखील केलेली आहेत. सध्या ती अनेक मालिकांतून आपल्या दिसत असते. हिंदी चित्रपटात देखील तिने काम केले आहे.
एका मुलाखतीत तिने सांगितले की, आपल्याला कुछ कुछ होता है हा चित्रपट प्रचंड आवडत असल्याचे तिने सांगितले. आता अमृता खानविलकर बॉलीवुड आणि मराठी चित्रपट सृष्टीत चांगलीच रुळली आहे. 2015 मध्ये तिने हिमांशू मल्होत्रा याच्यासोबत लग्न केले असून हिमांशू हादेखील एक मोठा अभिनेता आहे.
अमृता खानविलकर हिने आपल्या मेहनतीवर मराठी चित्रपट सृष्टी त नाव कमावले आहे. आजवर तिने अनेक चित्रपटात काम केले असून ती एका शोसाठी किंवा एका चित्रपटासाठी काही लाखांमध्ये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते. अमृता खानविलकर हीची एकूण संपत्ती ही तीस कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात येते. तसेच अमृताकडे सध्या अनेक चित्रपट असल्याचेही सांगण्यात येत आहे.
मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या की अमृता ही आपला पती हिमांशूपासून वेगळे राहणार आहे. माञ असे काही नाही. हिमांशू हा देखील हिंदी चिञपटात कार्यरत असतो. हिंदी चिञपटात येण्यापूर्वी हिमांशू याने देखील खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. हिमांशू याने हिंदी चित्रपट सृष्टी मधील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्टचे काम असल्याचे सांगण्यात येते.
तो अतिशय हरहुन्नरी कलाकार आहे. नच बलिये या शोमध्ये ही जोडी आपल्याला दिसली होती. अमृता खानविलकर हिने नटरंग या चित्रपटांमध्ये वाजले की बारा या गाण्यावर धमाल उडवून दिली होती. तिचे हे गाणे इतके लोकप्रिय ठरले की आजही तिला याच गाण्यामुळे ओळखले जाते. अमृता ही अतिशय बिनधास्त अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांना ती नेहमीच सोशल मीडियावर माहिती असते आणि आपले फोटो देखील शेअर करत असते. आतादेखील अमृता खानविलकर आणि तिच्या पतीबद्दल एक माहिती समोर आली आहे. अमृता आपल्या पतीपासून वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, हे सत्य नसून अमृता खानविलकर हिच्याकडे अनेक चित्रपट मालिका आणि शोचे काम सुरू असते.
त्यामुळे तिला मुंबईत राहावे लागते, तर तिचा पती हिमांशू हा मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. तो त्याच्या आईकडे सध्या राहतो. दिल्लीमध्ये देखील त्याचे अनेक कामे असतात. त्यामुळे तो दिल्लीत राहतो. मात्र, दोघेही सध्या एकत्रच आहेत. त्यामुळे या बातमीचा अनर्थ काढू नये, असे देखील अमृता हिने म्हटले आहे.
त्यामुळे दोघेही एकत्रच आहेत, तर आपल्याला अमृता खानविलकर आवडते का? नक्की सांगा.