….तर, यामुळे अमिताभ बच्चन वहिदा रेहमान यांचे शूज घेऊन पळाले होते.

….तर, यामुळे अमिताभ बच्चन वहिदा रेहमान यांचे शूज घेऊन पळाले होते.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की बिग बी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान यांचे खूप मोठे फॅन आहेत. सुपरस्टार अमिताभ यांनी एका टीव्ही रियलिटी शोमध्ये याचा खुलासा केला होता. तर आज तुम्हाला त्यांच्याशी संबंधित असलेली एक कहाणी सांगणार आहोत.

सोनी टीव्ही वरील शो ‘सुपरस्टार सिंगर’ च्या एका विशेष भागात अमिताभ बच्चन, वहीदा रहमान आणि आशा पारेख यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. ज्यामध्ये बच्चन यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की, चित्रपटसृष्टीत तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडते?

त्याला उत्तर म्हणून अमिताभ यांनी दिलीप कुमार आणि वहीदा रेहमान यांची नावे घेतली. वहीदा यांच्याबद्दलची आवड व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वहादा रहमान यांचे शूज घेऊन त्यांच्याकडे ते पळत आले होते.

या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, चित्रपट ‘रेशमा और शेरा’ चित्रपटात मला पहिल्यांदा वहीदा रहमानसोबत काम करण्याची संधी मिळाली. शूटिंग दरम्यान सुनील दत्त आणि वहीदा यांना वाळवंटात अनवाणी पाय ठेवून बसायचे होते, तिथे तापमान जास्त असल्यामुळे शूज घालून वाळूमध्ये उभे राहणे अशक्य होते.

त्यांनी पुढे सांगितले की, या गोष्टीला घेऊन ते काळजीत होते, की वहिदा जी अशा परिस्थितीत कसे शूट करतील आणि तेही शूजविना. म्हणून दिग्दर्शकाने ब्रेकची घोषणा करताच वेळ न गमावता मी वहीदा जीचे शूज उचलले आणि त्यांच्या दिशेने पळत गेलो.

तो क्षण माझ्यासाठी किती विशेष होता हे देखील मी सांगू शकत नाही. नंतर अमिताभ बच्चन यांनी वहीदा रहमान यांच्या सोबत ‘त्रिशूल’, ‘अदालत’ आणि ‘नमक हलाल’ सारखे चित्रपट केले.

विशेष म्हणजे हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान या पन्नास, साठ आणि सत्तरच्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. हिंदीसह तेलुगु,तामिळ, आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनय केला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्याला पहिला ब्रेक मिळाला तो सीआयडी या चित्रपटाद्वारे. या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केली होती. या सिनेमात गुरू दत्त वहीदा यांच्याबरोबर दिसले होते.

आमचे पेज नक्की लाईक करा.

Team Beauty Of Maharashtra