‘आमच्या जीवाला धोकाय’ नितीश चव्हाणने केले पळून जाऊन केले लग्न ? जाणून घ्या सत्य

लागिर झालं जी या मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तो पळून जाऊन लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आम्ही आपल्याला याबाबत माहिती देणार आहोत.
‘लागिर झालं जी’ या मालिकेमधील एका अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले होते. याबाबतची चर्चा अजूनही सुरूच आहे. मध्यंतरी या मालिकेत काम करणारा अभिनेता नितीश चव्हाण म्हणजेच आज्या यानेदेखील एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याने व्हिडीओ शेअर करताना आपल्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती.
या व्हिडिओमध्ये नीतीश चव्हाण म्हणाला होता की, आमच्या मालिकेत काम करणारे एक अभिनेते ज्ञानेश माने यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे अपघाती निधन झाले होते. मात्र, त्या बातमीवर माझा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे माझे निधन झाले की काय असे सगळ्यांना वाटत होते.
मात्र, असे काही झाले नाही. माझ्याबद्दल ही अफवाच आहे. त्यामुळे माझी प्रकृती एकदम उत्तम आहे, असे त्याने सांगितले आहे. लागिर झालं जी या मालिकेमध्ये किरण गायकवाड याने देखील जबरदस्त असे काम केले होते. लागिर झालं जी या मालिकेमध्ये आज्या आणि शितली यांची जोडी देखील प्रचंड गाजली होती.
या मालिकेमध्ये शितलीची भूमिका शिवानी बावकर हिने साकारली होती. शिवानी बावकर सध्या कुसुम या मालिकेत चांगले काम करताना दिसत आहेत. तर आजा म्हणजे नितीश चव्हाण हा देखील अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये सध्या काम करताना आपल्याला दिसत आहे.
नितीश चव्हाण याच्याबाबतीचा नुकताच एक व्हिडिओ देखील शेअर झाला आहे. या व्हिडिओमध्ये नितीश चव्हाण हा पळून जाऊन लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे, तर हा व्हिडीओ जो आहे तो खोटा आहे. नितीश चव्हाण हा पळून जाऊन लग्न करणार नाही, तर तो नुकताच एका चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाचे नाव सोयरीक असे आहे. सोयरिक चित्रपटामध्ये नीतीश चव्हाण याच्यासोबत मानसी भवाळकर ही दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
त्यामुळे आज्या हा पळून जाऊन लग्न करणार नसून त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन चा हा भाग असल्याचे सांगण्यात येते.