जुळून आल्या रेशीमगाठी! आलिया झाली कपूर कुटुंबाची सून; रणबीरसोबत घेतले ‘सात फेरे’ पहा फोटो

जुळून आल्या रेशीमगाठी! आलिया झाली कपूर कुटुंबाची सून; रणबीरसोबत घेतले ‘सात फेरे’ पहा फोटो

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची. बराच काळ एकमेकांना डेट करणारी ही जोडी नेमकं कधी लग्न करणार हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला होतात. त्यातच त्यांच्या लग्नाचे अनेक अपडेट्स समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. विशेष म्हणजे चाहत्यांची ही उत्सुकता आता संपली असून रणबीर आणि आलिया यांनी अखेर आज (१४ एप्रिल) लग्नगाठ बांधली आहे.

‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार, आलिया आणि रणबीरने पाली हिल येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यामुळे आलिया आता ऑफिशिअली कपूर कुटुंबाची सून झाली आहे.

आलिया आणि रणबीर यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार, लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे आता आलिया यापुढे मिसेस कपूर या नावाने ओळखली जाणार आहे.

लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, दोन्ही कुटुंबातील एकाही व्यक्तीने या लग्नाची तारीख वा वेळ सांगितली नव्हती. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. लग्नापूर्वी आलिया आणि रणबीर यांची मेहंदी, हळद, चुडा, कुलदेवता पूजा अशा अनेक पद्धती रितीरिवाजानुसार पार पडल्या.

Team Beauty Of Maharashtra