फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं

फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार हा सध्या अतरंगी रे या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयचे बऱ्याचवेळा अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे.अक्षयचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अक्षय फोटोग्राफर्ससमोर पोज देत फोटो काढताना दिसत आहेत. तेवढ्यात एक पोलिस कर्मचारी अक्षयसोबत फोटो काढायला पुढे येतो.

त्या पोलिस कर्मचाऱ्याला पुढे आलेलं पाहून सुरक्षा रक्षक त्याला बाजुला करतो. हे पाहता अक्षय सुरक्षा रक्षकाला थांबवतो आणि त्या पोलिसासोबत फोटो काढतो. अक्षयचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.अक्षय लवकरच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अक्षयसोबत सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धानुष दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Team Beauty Of Maharashtra