अखंड साम्राज्य राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील करोडपती? अक्षय्य तृतीयेपासून वर्षभर बक्कळ धनलाभाची संधी

अखंड साम्राज्य राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील करोडपती? अक्षय्य तृतीयेपासून वर्षभर बक्कळ धनलाभाची संधी

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. या राशीपरिवर्तनाच्या काळात जर एखादा ग्रह अन्य ग्रहाच्या स्वामित्वाच्या राशीत प्रवेश घेत असेल किंवा भ्रमण करत असेल तर यातून अनेक राजयोग सुद्धा तयार होऊ शकतात. या आठवड्याच्या शेवटी असाच एक राजयोग तयार होत आहे. पण खास गोष्ट अशी की, हा योग अत्यंत पवित्र अशा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तयार होत आहे. असं म्हणतात, की अक्षय्य तृतीयेला केलेली खरेदी, कृती ही अक्षय्य काळासाठी अबाधित राहते. त्यामुळेच या राजयोगाने दिसणारा प्रभाव हा काही राशींना दीर्घकाळ अनुभवता येऊ शकतो.

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार गुरु व चंद्र एकत्र आल्याने २२ एप्रिलला अखंड साम्राज्य राजयोग तयार होत आहेत. गुरु ग्रह २२ एप्रिलला या वर्षातील आपले सर्वात मोठे गोचर करणार आहे. गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश घेत असल्याने या दिवसापासून संबंधित तीन राशींना प्रचंड धनलाभाचे व प्रगतीचे योग आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या हे ही पाहूया…

मिथुन रास (Mithun Rashi)
अखंड साम्राज्य राजयोग बनल्याने मिथुन राशीसाठी धनलाभाचा काळ सुरु होण्याची शक्यता आहे. गुरु ग्रह आपल्या राशीच्या इन्कम भावी असल्याने तुमचे आर्थिक स्रोत वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची साथ लाभल्याने करिअरमध्ये यशाची शिखरे पादाक्रांत करता येऊ शकतात. तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातून तुम्हाला नशिबाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Sinha Rashi)
अखंड साम्राज्य राजयोग तयार झाल्याने सिंह रास आर्थिक दृष्टीने समृद्ध होण्याची शक्यता आहे. हे येणारे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. सिन राशीच्या मंडळींच्या भाग्यात संतती प्राप्तीचे योग आहेत. तुमच्या अत्यंत जवळच्या माणसाच्या प्रगतीचा तुम्हाला भाग होता येईल त्यामुळे तुम्ही भारावून जाऊ शकता. आई वडिलांचा मान वाढवण्याची संधी लाभू शकते. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत.

मकर राशी (Makar Rashi)
अखंड साम्राज्य राजयोग मकर राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. गुरु ग्रह आपल्या राशीच्या कुंडलीत चतुर्थ स्थानी तयार होत आहे. या काळात वाहन व प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. नोकरदार मंडळींसाठी कामात प्रगतीची संधी आहे. तुमचे वरिष्ठ व सहकारी तुमच्या कामावर खुश झाल्याने याचा प्रभाव तुमच्या पगारवाढीवर व प्रमोशनवर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी लाभल्याने तुम्हाला कामात नाविण्य अनुभवता येऊ शकते. एकूणच पावलोपावली धनलाभ होण्याचे योग आहेत.

Team BM