‘अजिंक्य देव’ यांच्या पत्नी आणि मुलांना आपण का ? मुलगा आहे प्रसिद्ध कलाकार

मराठी चित्रपट सृष्टी आणि बॉलीवूडमध्ये रमेश देव, सीमा देव यांची जोडी ही फारच लोकप्रिय होती. रमेश देव यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला बॉलीवूड मधून अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.
रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव अशी मुलं आहेत. दोघेही चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत. अजिंक्य देव हे प्रसिद्ध अभिनेते आहेत, तर अभिनय देव हे दिग्दर्शक आणि फोटोग्राफी करतात. अजिंक्य देव यांनी 80 90 चा दशकामध्ये अनेक चित्रपटात काम केले. विशेष करून त्यांचा माहेरची साडी हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता.
या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. अलका कुबल यांच्या भावाची भूमिका त्यांनी साकारली होती. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये देखील अजिंक्य देव यांनी अनेक चित्रपटात काम केले. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या तानाजी या चित्रपटामध्ये त्यांनी अतिशय जबरदस्त काम केले होते.
त्यांची भूमिका छोटी असली तरी ती लोकप्रिय ठरली होती आणि बोलण्याची लकब असलेले अजिंक्य देव हे खऱ्या आयुष्यामध्ये देखील अतिशय साधे असे आहेत. अनेकांना ते मदत करत असतात. त्याचा प्रत्यय अनेक जणांना आलेला आहे. अजिंक्य देव येत्या काळामध्ये आपल्याला आणखीन काही चित्रपटात देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येते.
अजिंक्य देव हे अतिशय लोकप्रिय असे अभिनेते आहेत. अजिंक्य देव यांच्या पत्नीचे नाव आरती देव असे आहे. आरती देव या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. अजिंक्य देव हे पार्ला येथे कॉलेजमध्ये शिकत होते. ते बीएससी करत होते. त्याच वेळेस त्यांनी आरती यांना पाहिले होते. त्यानंतर ते त्यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर डिसेंबर 1986 मध्ये या दोघांनी लग्न देखील केले.
या दोघांना दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव आर्य असे आहे. मोठा मुलगा आर्य हा बॉलीवूडमध्ये सक्रिय असून तो सहाय्यक दिग्दर्शनाचे काम करतो, तर त्यांची मुलगी ही मात्र विशेष आहे. याच कारणामुळे या दांपत्याने विशेष मुलांसाठी एक शाळा उघडली असून या शाळेच्या माध्यमातून ते विशेष मुलांसाठी अतिशय चांगली असे काम करत असतात.
या दोघांच्या संसाराला 37 वर्षाचा काळ लोटला असला तरी आजही दोघेही चीर तरुण असल्याचे दिसते. तर मित्रांनो तुम्हाला अजिंक्य देव यांनी केलेला कुठला चित्रपट आजवर सर्वाधिक आवडला ? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.