ह्या दिग्गज कलाकाराची नातसून आहे ‘अगबाई सूनबाई’ मधील शुभ्रा, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

ह्या दिग्गज कलाकाराची नातसून आहे ‘अगबाई सूनबाई’ मधील शुभ्रा, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

अग बाई सूनबाई ही मालिका आता लवकरच बंद होणार असल्याचे सांगण्यात येते. या मालिकेला पुरेसा प्रेक्षकवर्ग मिळाला नाही. त्यामुळे ही मालिका बंद करण्यात येत आहे. अग बाई सासुबाई ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ, डॉक्टर गिरीश ओक यांच्या भूमिका होत्या. मात्र, या मालिकेचा दुसरा भाग देखील बनवण्यात आला होता.

या दुसर्‍या भागामध्ये निवेदिता सराफ, डॉक्टर गिरीश ओक यांची जोडी होती. त्यांच्या सोबतच एक गोंडस अशी अभिनेत्री दिसली होती. तिने मालिकेतील शुभ्राचे पात्र साकारले होते. तिचे खरे नाव उमा पेंढारकर असे आहे. होय उमा पेंढारकर हिने याआधी स्वामिनी या मालिकेत देखील काम केले होते. स्वामिनी ही मालिका चांगली गाजली होती. मात्र, मध्यंतरी ही मालिका बंद झाली.

हेच दुःख तिच्या वाट्याला अगबाई सुनबाई या मालिकेच्या निमित्ताने देखील आले. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तेजश्री प्रधान हिने दुसर्‍या भागामध्ये काम करण्यास नकार दिला होता. याचे कारणही मजेशीर होते. कारण दुसर्‍या भागामध्ये शुभ्राच्या वाट्याला फारशी चांगली भूमिका आली नव्हती. त्यामुळे तिने मालिका करण्यास नकार दिला होता. तिचा निर्णय जवळपास योग्य ठरला, असे म्हणावे लागेल. कारण ही मालिका आता बंद होत आहे.

आज आम्ही आपल्याला शुभ्रा हिच्या खऱ्या आयुष्यबद्दल माहिती देणार आहोत. शुभ्राचे खरे नाव आम्ही आपल्याला सांगितलेच आहे. उमा पेंढारकर हिने याआधी देखील काही जाहिरात व मॉडेलिंग मध्ये आपले नाव कमावलेले आहे. अतिशय सोज्वळ आणि लोभस चेहरा असलेली उमा ही पाहता क्षणी सर्वांना आवडून जाते. कुठलाही कट-कारस्थान चेहर्‍यावर नसलेला लोभस असा तिचा चेहरा सगळ्यांनाच खूप आवडतो.

उमा पेंढारकर ही ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा पाया रचला अशा दिग्गज भालजी पेंढारकर यांची नातसून आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. भालजी पेंढारकर यांनी जुन्या काळामध्ये अनेक दिग्दर्शकांसोबत व दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले आहे. भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी, बहिर्जी नाईक, बाजीराव मस्तानी, पावनखिंड यासारखे चित्रपट जुन्या काळात दिले होते.

हे सगळे चित्रपट त्यांचे प्रचंड गाजले होते. लता मंगेशकर यांचा त्यांच्याशी विशेष ऋणानुबंध होता. याचबरोबर मराठीतील दिग्गज असे महर्षी व्ही. शांताराम यांचे आणि त्यांचे देखील ऋणानुबंध होते. खऱ्या अर्थाने दादासाहेब फाळके यांच्या नंतर मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम भालजी पेंढारकर यांनी केले होते. भालजी पेंढारकर यांचा मुलगा ज्ञानेश हेदेखील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि संगीतकार होते.

ज्ञानेश यांचा मुलगा म्हणजे ऋषिकेश. ऋषिकेश हा देखील आपल्या घराण्याचा वारसा जपतो आहे. मात्र तो सध्या आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये करिअर करत आहे. त्याला संगीताची देखील आवड आहे. मात्र, खऱ्या अर्थाने त्याची पत्नी म्हणजेच उमा पेंढारकर ही पेंढारकर घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे.

आपल्याला उमा पेंढारकर आवडते का? तिने काम केलेली कुठली मालिका आपल्याला आवडली, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra