अरबपति सोबत लग्न होताच बॉलीवुडला रामराम ठोकला या अभिनेत्रीने, आमिरची नायिका बनून झाली होती सुपरहिट

अरबपति सोबत लग्न होताच बॉलीवुडला रामराम ठोकला या अभिनेत्रीने, आमिरची नायिका बनून झाली होती सुपरहिट

मिस्टर परफेक्ट म्हणजेच आमिर खान आणि दबंग खान म्हणजेच सलमान खान यांच्यासह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री असिन आपल्या सर्वांना आठवतच असेल.

असिनने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप नाव कमावले आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर असिनने उद्योगपती राहुल शर्माशी लग्न केले आणि बॉलिवूडला निरोप दिला. असिनने आपल्या कारकिर्दीची सुरूवात दक्षिण चित्रपटांमधून केली आणि कारकीर्द ही बॉलिवूड मध्ये येऊन संपली.

असिनने आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरूवात 2001 मध्ये “नरेंद्रेन मकान जयकंथान वाका” या चित्रपटाद्वारे केली होती. त्यावेळी असिन अवघ्या 15 वर्षांची होती.

लहान वयात असिनने तमिळ, तेलगू आणि मल्याळम यासारख्या भाषांमध्ये बर्‍याच सुपरहिट चित्रपटांत काम केले. सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान आणि अभिषेक बच्चन सारख्या मोठ्या स्टार्ससह असिनने सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

असिनने ‘गजनी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. ‘गजनी’मध्ये ती आमिर खानची नायिका बनली होती. ‘गजनी’ नंतर असिनने एकामागून एक अनेक हिट चित्रपटांत काम केले. त्यानंतर 2016 मध्ये तिने मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्माशी लग्न केले. जेव्हा राहुलने असिनबरोबर लग्न जमवले तेव्हा त्याची एंगेजमेंट रिंग खूप चर्चेत आली होती.

राहुलने असिनला गुडघ्यावर खाली बसून रोमँटिक शैलीत 20 कॅरेटची सॉलिटेअर रिंग दिली केली. अंगठीची किंमत सुमारे 6 कोटी होती.

राहुल यांनी 2000 साली आपल्या या कंपनीची स्थापना केली. व्यवसाय हाताळण्याव्यतिरिक्त राहुल एक चांगला बॅडमिंटनपटू आहे. 2014 मध्ये मायक्रोमॅक्सचा महसूल 10 हजार कोटी होता. राहुल शर्मा या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. त्यांच्यासमवेत विकास जैन, सुमित अरोरा, राजेश अग्रवाल हे आहेत. आता असिनही तिच्या पतीचा 2000 कोटींचा व्यवसाय सांभाळत आहे.

मागे 24 ऑक्टोबर 2017 रोजी असिनने एका मुलीला जन्म दिला होता. असिन चित्रपटांपासून दूर आहे आणि ती सोशल मीडियापासूनही दूर राहते. गरो दरपणात ति कोणालाच दिसली नाही. ‘क्वीन ऑफ साउथ फिल्म्स’ म्हणून ओळखली जाणारी असिन तिच्या 2016 च्या लग्नानंतर जणू गायब झाली आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra