अंथरुणावर खिळलेल्या या मराठी अभिनेत्रीची केली मुख्यमंत्र्यांनी विचारपूस !

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक असे अनेक कलाकार आहेत की, ज्यांना अतिशय कमी मानधन मिळते आणि कमी मानधन मिळाल्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यास अवघड जाते. तसेच एखादी घटना किंवा दुर्घटना घडल्यास त्यांना खर्च भागवण्यासाठी अतिशय कसरत करावी लागते.
ज्येष्ठ कलाकार जे असतात त्यांना मराठी मालिका किंवा चित्रपटात काम मिळते. मात्र, मानधनही अतिशय कमी मिळत असते. यामुळे देखील त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. आता एका अभिनेत्रीचा असाच अपघात झाला आहे. त्यामुळे त्या अतिशय अडचणीत सापडल्या आहेत.
काही दिवसापूर्वीच “जीव माझा गुंतला” या मालिकेत काम करणारी अभिनेत्री सुमेधा दातार यांचा अपघात झाला होता. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. याबाबत त्यांनी देखील सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती. सुरुवातीला त्या म्हणाल्या होत्या की, पाय मुरगळला असे वाटले होते.
मात्र, त्यानंतर माझ्या पायाला फ्रॅक्चर झाले असे त्यांनी सांगितले. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बाबत माहिती देणार आहोत. यांचाही अपघात झाला आणि त्या आता घरी सध्या आराम करत आहे. या अभिनेत्रीचे नाव वर्षात दांदळे असे आहे.
वर्षा यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी माझ्या पायाला दुखापत झाली आहे. आता पाय माझा फारच त्रास देत आहे. त्याचप्रमाणे पाठीच्या मणक्याला देखील त्रास होत आहे. हा अपघात फार भीषण होता. आता मी सध्या घरी आराम करत आहे. माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सदिच्छा व्यक्त करून प्रार्थना करा, असे त्यांनी आपल्या चाहत्यांना म्हटले आहे.
वर्षा यांनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. वर्षा यांनी पाहिले न मी तुला या मालिकेत काम केले. त्याचबरोबर त्यांनी नांदा सौख्यभरे या मालिकेत वच्छि आत्या ही भूमिका साकारली होती. त्यांनी एकाच या जन्मी जणू ही मालिका देखील केली होती.
त्याचबरोबर आनंदी हे जग सारे , यासारख्या मालिकेत काम केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा दांदळे यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी याची दखल घेतलेली आहे. वर्षा या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षिका देखील होत्या.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना वर्षा यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार किशोरी पेडणेकर यांनी नाशिक येथे जाऊन वर्षा दांदळे यांची भेट घेऊन त्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वर्षा यांना चांगलेच गहिवरुन आले.
त्यांनी याबाबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये कलाकारांना अतिशय मानाचे आणि सन्मानाचे स्थान आहे. आपण माझी तातडीने दखल घेतली. याबाबत मी आभारी आहे, असे त्या म्हणाल्या.