बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध कलाकारांचे चालू होते गुपचूप प्रेम प्रकरण, त्या स्टार्सची नावं ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.

चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. आणि असं होऊ पण का नाही!
आपल्यामधून बर्याच जणांना या गोष्टीवर लक्ष ठेवणे आवडते की बॉलिवूडमध्ये कोण कोणाबरोबर डेट करतो आणि कोण कोणत्या सेलिब्रेटीशी लग्न करतो. तसे, मला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या बॉलिवूड च्या आवडत्या सेलिब्रिटी च्या प्रकरणांबद्दल माहिती असेल. पण तुम्हाला माहिती आहे का..? बॉलीवूडमध्ये काही सीक्रेट लव्ह प्रेमप्रकरण असतात ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.
होय, बॉलिवूड इंडस्ट्री ग्लॅमरने भरलेली आहे, ज्यात प्रत्येकाची नजर नेहमी सेलिब्रिटीवर असते.आणि प्रत्येकाची लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे सेलिब्रेटींचे प्रेम प्रकरणच. आपण बर्याच प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या डेटिंगविषयी ऐकले असेल, पण हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही प्रेमाच्या गोष्टी अजूनही गुप्तच आहेत. आणि तरी त्यांनी त्यांच्या संबंधित जीवनात प्रगती केली आहे, चला अशा प्रकारच्या 5 सेलेब्रिटी आणि त्यांच्या लपवलेल्या नात्यांकडे एक नजर टाकू ज्या तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील.
1) आमिर खान आणि पूजा भट्ट – दिल है के मानता नहीं १९९१ मधील महेश भट्ट दिग्दर्शित कॉमेडी लव्हस्टोरी चित्रपट आहे.याची निर्मिती गुलशन कुमार यांनी केली होती आणि यात प्रमुख अभिनेत्री ची भूमिका करणारी पूजा भट्ट चा हा पहिला चित्रपट होता. पूजा भट्ट आणि आमिर खान यांनी या चित्रपटात एकत्र काम केले होते.
तरीपण, अजून या दोघांच्या प्रेमसंबंधाविषयी कोणी बोलत नाही. पण चित्रीकरणाच्या वेळी पूजा आमिरला पसंत करू लागली होती आणि एकदा असेही समोर आले की आमिरबरोबर तिचे नातं प्रेम आणि द्वेष असे दोन्हीप्रमाणे आहे.
2) दीपिका पादुकोण आणि निहार पांड्या – बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटण्यापूर्वी दीपिका पादुकोण तिच्या मॉडेलिंगच्या काळात निहार पांड्याशी रिलेशनशिपमध्ये होती. दोघांची पहिली भेट मुंबईतील अॅक्टिंग स्कूलमध्ये झाली. या दोघांनी हिमेश रेशमियाचा प्रसिद्ध अल्बम ‘आप का सूरूर’ मध्ये देखील काम केले होते. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून पदार्पणानंतर दीपिकाने रणबीर कपूरला डेट करण्यास सुरवात केली. निहारसोबत दीपिकाचे हे छुपे नातं अजूनही रहस्यमय आहे आणि याकारणामुळे तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.
3) अनुष्का शर्मा आणि जोहेब युसूफ – अनुष्का शर्मा देखील तिच्या मॉडेलिंगच्या काळात जोहेब युसुफशी रिलेशनशिपमध्ये होती.होय,अनुष्का शर्माचे पहिले प्रेम मॉडेल जोहेब युसूफ हा होता. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा त्यांच्या सुरवातीच्या काळापासून होत आहे. पण अनुष्काने, ‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने आपल्या भूतकाळात मागे वळून पाहिले नाही. आता, ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आनंदी आहे.तिने क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केले आहे.
4) रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक – अवंतिका मलिका ही रणबीर कपूर ची पहिली क्रश होती. अगदी रणबीरने करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट-शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये त्याच्या क्रशबद्दल सांगितले होते. असेही म्हटले जाते की रणबीर अवंतिकाला ‘जस्ट मोहब्बत’ च्या सेटवर भेटायला जात असे, त्यात ती बाल कलाकार म्हणून काम करत होती. पण, त्यांचे संबंध देखील वेळेसह अपूर्ण राहिले. दोघांचेही वय कमी होते.
5) रणवीर सिंग आणि अहाना देओल – रणवीर सिंग आणि अहाना देओल दोघेही आता विवाहित जीवन जगत आहेत. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की या अभिनेत्याने एकदा हेमा मालिनीची मुलगी अहाना देओल यांना डेट केले होते. कॉलेजच्या काळात रणवीर तिच्याशी रिलेशनशिपमध्ये होता, पण कॉलेजमधील दिवसानंतर त्यांचे नातं संपलं.