…म्हणून शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर एका रात्रीत उतरवण्यात आले होते..

सफर, चुपके-चुपके, छोटी बहू, काश्मीर की कली, वक्त अशा जबरदस्त चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा आज वाढदिवस आहे.
त्यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक जबरदस्त असे चित्रपट दिले आहेत. शर्मिला टागोर यांचा जन्म 8 डिसेंबर 1946 रोजी हैदराबादमधील एका हिंदू बंगाली कुटुंबामध्ये झाला. त्या काळातील सर्वात धाडसी नायिकांच्या यादीत शर्मिला प्रथम येत असे.
तिच्या बिकिनी शूटने संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ माजली होती. त्यांचे असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यात त्यांच्या अभिनयाला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता आणि तसेच लोकांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक देखील केले होते.
शर्मिला यांनी 1964 मध्ये ‘काश्मीर की कली’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती, या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती, लोक त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करू लागले होते. यानंतर शर्मिला टागोरने ‘एन इवनिंग इन पॅरिस’ चित्रपटात प्रथमच बिकिनी परिधान केली. तिचा बिकीनी सीन पाहिल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये एक खळबळ माजली होती. बॉलिवूडशिवाय तिच्या बिकीनी सीनचा वाद हा संसदेत चर्चेचा विषय झाला होता. या सीन संदर्भात लोकांनी संसदेत बराच वाद निर्माण केला.
यानंतर, 1968 मध्ये शर्मिलाचा हा बिकिनी शूट तिच्यावरच भारी पडु लागला. शर्मिला टागोरने ग्लॉसी फिल्म फेअर मासिकासाठी तिचे बिकिनी फोटोशूट केले होते. यावेळी मन्सूर अली खान पटौदी सोबत शर्मिलाचे अफेयर चालू होते. तिचे बिकीनी फोटोशूटचे मोठे मोठे पोस्टर संपूर्ण मुंबईत लावले होते. त्याचवेळी अचानक शर्मिला टागोर यांना समजले की मन्सूर अली खान त्यांच्या आईबरोबर तिला भेटायला मुंबईला येत आहे.
हे ऐकल्यानंतर शर्मिलाच्या जीवनातही गडबड सुरू झाली. शर्मिला खूप घाबरली होती की हे रूप पाहिल्यानंतर अली खानची आई त्यांना पसंद करेल की नाही. यानंतर शर्मिला विचार करू लागली की मन्सूरच्या आईने मुंबईत तिचे बिकिनी वाले होर्डिंग पाहिले तर काय होईल…? ती आपल्या मुलाला माझ्याशी लग्न करू देईल का…? परंतु शर्मिलाच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मन्सूरच्या आईकडूनच घेतली जाऊ शकतात.
तथापि, शर्मिलाच्या या रूपासाठी मन्सूरला कोणतीही अडचण नव्हती. कारण त्यांना तिचे प्रोफेशन व काम समजले होते. पण यामुळे शर्मिला खूप विचलित झाली, जेव्हा शर्मिलाला काहीच समजले नाही तेव्हा तिने चित्रपटाच्या निर्मात्याला बोलावून मुंबईत लावलेले तिचे बिकिनीचे पोस्टर काढण्यास सांगितले.
यानंतर मन्सूर आणि शर्मिलाचेही लग्न झाले होते आणि दोघांनाही दोन मुले आहेत जी आज चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरली आहेत. शर्मिला टागोर यांना उत्कृष्ट अभिनयासाठी दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय शर्मिलाला दोनदा फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.