यश झाला भावुक; सर्व प्रेक्षकांचे मानले आभार, जाणून घ्या काय कारण आहे नेमकं

यश झाला भावुक; सर्व प्रेक्षकांचे मानले आभार, जाणून घ्या काय कारण आहे नेमकं

झी मराठीवर सुरू असलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका आता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये अनेक वर्षानंतर अभिनेता श्रेयस तळपदे याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.

श्रेयस तळपदे या मालिकेमध्ये तो यश भूमिकेत दिसत आहे. या मालिकेमध्ये प्रार्थना बेहेरे हीदेखील दिसलेली आहे. याआधी तिने हिंदी मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. अवधूत गुप्ते यांच्या महाराष्ट्र भटिंडा या चित्रपटात तिने दर्जेदार अशी भूमिका साकारली होती, तर श्रेयस तळपदे याने देखील अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

काही वर्षापूर्वी त्याने मालिकेच्या माध्यमातूनच मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. आता तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टी देखील श्रेयस तळपदेने गाजवून सोडली. सुरुवातीला त्याने इकबाल हा चित्रपट हिंदीमध्ये केला होता. क्रिकेटवर आधारित हा चित्रपट होता.

त्याच्या या चित्रपटाला खूप मोठा प्रेक्षकवर्ग लाभला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही त्यावेळेस प्रचंड कमाई केली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. फराह खानच्या ओम शांती ओम चित्रपटामध्ये त्याने काम केले होते. या चित्रपटात शाहरुख खान हा मुख्य भूमिकेत दिसला होता.

श्रेयस तळपदे याची या चित्रपटात छोटी भूमिका असली तरी प्रेक्षकांमध्ये प्रचंड भावली होती, तर दीपिका पादुकोण हिने देखील या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीज मध्ये देखील श्रेयस तळपदे याने काम केले.

हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. अफलातून असे काॅमेडी टाइमिंग प्रेक्षकांना खूप भावले होते. आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये तो यश च्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील नेहा म्हणजेच प्रार्थना बेहेरे हिच्या प्रेमात पडल्याचे दाखवण्यात आले आहे.

या मालिकेमध्ये संकर्षण कराडे याने देखील अतिशय जबरदस्त अशी भूमिका केली आहे. तसेच या चित्रपटात मोहन जोशी यांची आजोबाची भूमिका ही प्रेक्षकांना खूप आवडली आहे, तर या मालिकेत बालकलाकार मायरा वायकूळ हिने परी ची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे, तर आता या मालिकेने नुकतेच शंभर भाग पूर्ण केले आहेत.

याबद्दल अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेने 100 भागंचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांचे आभार मानतो. आमच्यावर असेच प्रेम राहू द्या. काही चुकले असल्यास जरूर कळवा.

मालिका तुम्हाला सगळ्यांना आवडते यातच आमचे यश आले, असेही त्यांनी सांगितले आहे. तर आपल्याला ही मालिका आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra