या प्रसिद्ध खलनायकाचा जावई आहे बॉलिवूड मधला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, पहिल्या भेटीत या खतरनाक विलनच्या मुलीवर फिदा झाला होता.

बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी आता 41 वर्षांचा झाला आहे. 2 एप्रिल 1979 रोजी मुंबईत जन्मलेल्या शरमन जोशी हे मराठी कुटुंबातील आहेत, पण त्यांचे वडील अरविंद जोशी गुजराती रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते आहेत.
शरमनने आपल्या कारकीर्दीची सुरूवात 1999 च्या ‘गॉडमदर’ चित्रपटापासून केली होती. तथापि, त्याला 2001 मध्ये आलेल्या ‘स्टाईल’ चित्रपटातून ओळख मिळाली. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शिकारा’ चित्रपटात दिसलेला शरमन जोशी प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांचा जावई आहे.
‘3 इडियट्स’ आणि ‘फरारी की सवारी’ सारख्या चित्रपटात काम केलेल्या शरमन जोशी याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आपल्या लव्ह लाइफची सुरूवात केली. इथे त्याची भेट एका अश्या मुलीशी झाली. जिला शरमन पहिल्या भेटीतच तिच्यावर प्रेम करू लागला. आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्राची यांची मुलगी होती, आणि मुलीचे नाव प्रेरणा चोप्रा आहे.
पहिल्या भेटीनंतर प्रेरणालाही शरमन आवडला होता. तथापि, दोघांनी एकमेकांकडे आपली भावना व्यक्त केली नाही. यानंतर भेटींगाठीच्या फेऱ्या ह्या वाढत गेल्या आणि ते चांगले मित्र बनले. शरमनला प्रेरणाचे बोलणे वागणे अर्थात तिचा स्वभाव हा आवडला होता. तथापि, दोघांनी कधीही एकमेकांना प्रपोज केले नाही. पण जवळपास एक वर्ष त्यांनी एकमेकाला डेट केले.
1999 मध्ये सुरू झालेल्या डेटिंगचा हा खेळ 2000 मध्ये संपला. यानंतर या दोघांनी 15 जून 2000 रोजी गुजराती रीतीरिवाजाने लग्न केले. ज्या वर्षी दोघांचे लग्न झाले त्याच वर्षी शरमन जोशीने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लग्नानंतर 5 वर्षानंतर प्रेरणाने ऑक्टोबर 2005 मध्ये एका गोंडस मुलगी ख्यानाला जन्म दिला. त्यानंतर जुलै 2009 मध्ये ती वार्यान आणि विहान या जुळ्या मुलांची आई बनली.
प्रेम चोप्राला तीन मुली आहेत. रकिता, पुनिता आणि प्रेरणा. मोठी मुलगी रकिताने स्क्रीन लेखक आणि प्रसिद्धी डिझाईनर राहुल नंदाशी लग्न केले आहे. त्याचप्रमाणे मधली मुलगी पुनीताने गायक आणि टीव्ही अभिनेता विकास भल्लाशी लग्न केले आहे. सर्वात लहान मुलगी प्रेरणा शरमन जोशीशी विवाहबद्ध झाली आहे.
प्रेम चोपड़ाचा जावई शरमन जोशी याने 1999 मध्ये डायरेक्टर विनय शुक्ला यांचा आर्ट फिल्म ‘गॉड मदर’ याद्वारे बॉलीवुड मध्ये डेब्यू केला होता. यानंतर तो ‘स्टाइल’ (2001), ‘एक्सक्यूज मी’ (2003), ‘शादी नंबर वन’ (2005), ‘रंग दे बसंती’ (2006), ‘गोलमाल’ (2007), ‘3 इडियट्स’ (2009) आणि ‘फरारी की सवारी’ (2012) यांसारख्या चित्रपटात दिसला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.