‘या’ प्रसिद्ध मराठी कलाकारांचे हे आहेत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, 5 नंबर वाली जोडी तर…

‘या’ प्रसिद्ध मराठी कलाकारांचे हे आहेत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, 5 नंबर वाली जोडी तर…

आपण अनेकदा मालिका पाहत असताना त्यामध्ये काम करत असलेल्या अभिनेता व अभिनेत्री यांच्या खऱ्या पती-पत्नी बद्दल माहिती जाणून घेण्यास इच्छुक असतो. मात्र, आपल्याला ही माहिती अनेकदा मिळताना दिसत नाही. मालिकेत काम करणाऱ्या दोघांपैकी काही जोड्या अशा आहेत की ज्या खरे आयुष्यामध्ये पती-पत्नी देखील आहेत.

यामध्ये सुखदा खांडकेकर व अभिजीत खांडकेकर हे पती पत्नी आहेत. तसेच सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर हे देखील पती-पत्नी आहेत. आणि विशेष म्हणजे हे दोघेही अभिनेता व अभिनेत्री आहेत. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनर बद्दल माहिती देणार आहोत.

1) विराजस कुलकर्णी – विराजस कुलकर्णी हा अभिनेता सध्या चर्चेत आहे. त्याला अनेक मालिका सध्या मिळत आहेत. त्याच्या पार्टनर चे नाव आहे शिवानी रांगोळ आहे. शिवानी ही देखील अभिनेत्री असल्याचे सांगण्यात येते. तिने अनेक मालिकात काम केलेले आहे.

2) रुपाली भोसले – रुपाली भोसले ही अभिनेत्री अनेक मालिका दिसली आहे. ती आई कुठे काय करते या मालिकेत चर्चेत आलेली आहे. रूपाली भोसलेचे मिलिंद शिंदे सोबत अशी लग्न झाले होते. मात्र, तिने त्याला घटस्फोट दिला आहे. आता ती अनिकेत मगरेला डेट करत असल्याचे सांगण्यात येते.

3) शाल्व किंजवडेकर – शाल्व याने देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्याकडे आगामी काही काळात आणखी काही मालिका आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्याच्या पार्टनरच नाव श्रेया डफलापूरकर असे आहे. तिने देखील अनेक मालिकांत काम केले आहे.

4) पूजा बिरारी – पूजा बिरारी ही देखील एक अभिनेत्री असून तिच्याकडे अनेक मालिका व नाटक असल्याचे सांगण्यात येते. तिच्या पार्टनर चे नाव अनिकेत मसवेकर असे आहे.

5) सुयश टिळक – आपल्या अभिनयाने सर्वांचे मन मंत्रमुग्ध करणारा अभिनेता सुयश टिळक हा सध्या अक्षया देवधर हिला डेट करत असल्याचे सांगण्यात येते. या दोघांनी देखील याला दुजोरा दिला. अक्षरा देवधर हिने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केले आहे.

6)अजिंक्य नानावरे – अजिंक्य नानावरे हा देखील एक दिग्गज अभिनेता असून त्याने देखील अनेक चित्रपट मालिकांत काम केलेले आहे. त्याच्या प्रेयसीचे नाव शिवानी सुर्वे असे आहे. ती देखील अभिनेत्री आहे.

7) रसिका सुनील – रसिका सुनील ही गोंडस अशी अभिनेत्री असून तिने अनेक टीव्ही मालिका मध्ये काम केलेले आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत तिचे पात्र खूपच गाजले होते. रसिका ही आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे सांगण्यात येते.

8) निखिल चव्हाण – निखिल चव्हाण हा देखील सध्या सक्रिय असून त्याच्याकडे काही मालिका असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या प्रेयसीचे नाव पूर्वी शिंदे आहे. ती देखील एक अभिनेत्री आहे. तिच्याकडे देखील अनेक मालिका आहेत.

9) विना जगताप – विना जगताप ही दिग्गज अशी अभिनेत्री असून ती सध्या शिव ठाकरे याला डेट करत असल्याचे सांगण्यात येते. हे दोघे देखील लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

10) इशा केस्कर – इशा केस्कर ही सध्या काही मालिकांमधून दिसत आहे. तिच्याकडे काही नाटक देखील असल्याचे सांगण्यात येते. तिच्या बॉयफ्रेंड चे नाव ऋषी सक्सेना असे आहे.

11) भाग्यश्री लिमये – भाग्यश्री लिमये ही देखील उत्कृष्ट आणि गोंडस अशी अभिनेत्री आहे. तिच्याकडे काही मालिका व चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. ती भूषण प्रधान याला सध्या डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

Team Beauty Of Maharashtra