सई ताम्हणकर पु्न्हा प्रेमात, बॉयफ्रेंड सोबत खास फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

सई ताम्हणकर पु्न्हा प्रेमात, बॉयफ्रेंड सोबत खास फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

सई ताम्हणकर मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर चा उल्लेख केला जातो. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत बिनधास्त अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते.

सईला दुनियादारी या चित्रपटापासून नवीन ओळख मिळाली आहे. सई ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सईला अभिनयाची आवड असल्याने कॉलेजमध्ये असल्यापासून नाटक व एकांकिकांमध्ये तिने भाग घेतला आहे. तिच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले आहे.

आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत तिचे आधे अधोरे या दुसऱ्या नाटकामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सई ने तिच्या चाहत्यांना दिला सुखद धक्का आहे.सईने एक खास गोष्ट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती नेहमीच आपल्या अभिनय क्षेत्रात यशस्वी आहे.

तीने नेहमीच यशाची नवीन शिखरं पार केलेली आहे. सईला इंटरनेट मूव्ही डाटाबेस च्या बेस्ट ऑफ 2021 यादीत मानाचे स्थान मिळाले आहे. आयएमडीबीनं भारतीय चित्रपट आणि सिरीज मधला 10 सर्वोत्तम कलाकारांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत सईचे देखील स्थान आहे.

समांतर, नवरसा ,मिमी ,अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या कलाकृती मधून वेगळ्या धाटणीच्या भूमिका सईने उत्तम प्रकारे साकारलेली आहे. सईला ब्रेक आऊट स्टार म्हणून यादीत स्थान मिळाले आहे. सईने एका खास व्यक्तीचा फोटो शेअर करत “दौलतराव सापडला” असे कॅप्शन देखील दिले आहे. सईने निर्माता अनिश जोग सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं आहे.

अनेक सेलिब्रिटींनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. सईने गेल्या अनेक वर्षात तिच्या खासगी आयुष्याबद्दल कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नव्हते. ही खास गोष्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Team Beauty Of Maharashtra