अभिनेत्री अमृता खानविलकर कोसळला दुख:चा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

अभिनेत्री अमृता खानविलकर कोसळला दुख:चा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काहि दिवसांपूर्वी तिचा रिलीज झालेला ‘चंद्रमुखी’ सिनेमाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. आपल्या डान्स आणि अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री चर्चेत असते. पण यावेळी ही अभिनेत्री एका भावूक पोस्टमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने आपण आपल्या मावशीला गामावल्याचं सांगतलं आहे.

नुकतंच अमृताच्या मावशीचं निधन झालं आहे. त्यामुळे खानविलकर कुटूंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. अमृताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मावशी विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोस्ट शेअर करत अमृताने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ”आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा …. छान रहा …. नीट रहा आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील तू परत लहान होऊन जा …

तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांनसाठी …. आमच्या कुटुंबासाठी त्याची परत फेड आम्ही कोणी करूच शकत नाही. मम्मा … मी … अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो माऊ तुला खूप मिस करणार ग तुला …. खूप अजून आपल्याला किती फिरायचं होतं. बोलायचं होतं …. मॉम ला …मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं पण माऊ तू नीट राहा आता तू काळजी करू नकोस”.

आज मी तुला ज्या प्रकारे पाहिलं ते पाहून मी सुन्न झालीये….माझ्या माऊशीपेक्षा तू माझ्यासाठी आई होतीस… तुला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना आणि तरीही खंबीरपणे उभं राहून तुझ्या कुटुंबासाठी उद्या नसल्यासारख्या गोष्टी करताना पाहून मला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव झाली… आम्हाला स्वतःच्या हातांनी खाऊ घालण्यापासून ते मला आणि अदितीला आमच्या करिअरमध्ये पुढे ढकलण्यापर्यंत तु  नेहमीच आमच्या पाठिशी होतीस. या जगाच्या शेवटपर्यंत मला तुझी आठवण येईल. आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद

मला माहित आहे की तु एका चांगल्या ठिकाणी आहेस. जिथे तु  शेवटी शांततेत विश्रांती घेऊ शकशील. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करीन Ps, dont worry about mamma you know I ll take care, Mau rest in peace

अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच तिला तिच्या कमेंट बॉक्स मध्ये तिचे चाहते आणि कलाकार मंडळी धीर देताना दिसत आहेत.

Team Beauty Of Maharashtra