अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे बाबत मोठी दुःखद बातमी

अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे बाबत मोठी दुःखद बातमी

महाराष्ट्रात चित्रपट हे अनेक बनत असतात. चित्रपटावर देखरेख करण्यासाठी अनेक संस्था देखील आहेत. चित्रपट महामंडळ हे त्यापैकीच एक. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून चित्रपटासाठी काय करता येईल, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत अनेक निर्णय घेण्यात येतात.

कोल्हापूरमध्ये याचे मुख्यालय आहे. कोल्हापुरातूनच हा सर्व कारभार चालताना दिसतो. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून या महामंडळाकडे अनेकांचे दुर्लक्ष झाल्याचे देखील सांगण्यात येते. अनेक जण महामंडळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतात, असे सांगतात. तर अनेक जण याची निवडणूक लढण्यास देखील इच्छुक नसतात.

मात्र, काही कलाकार हे वर्षानुवर्ष या संस्थेवर कार्यरत आहेत. संचालक पदावर कार्यरत असातना अनेकांवर आरोप देखील झाले. या महामंडळाच्या संचालक पदावरूनच गैरव्यवहार करता येतात, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. आता नुकतेच एक प्रकरण समोर आले असून 2012 मध्ये एक अनावश्यक खर्च झाला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने आता जेष्ठ कलाकारांना दणका दिला आहे.

यामध्ये अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह विजय पाटकर, प्रकाश सुर्वे आणि अनेक कलाकारांचा समावेश आहे. आता या कलाकारांना त्यांच्याकडील रक्कम कोर्टात भरावी लागणार आहे. एकूणच काय तर हे प्रकरण आता त्यांच्यावर शेकल्याचे पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

कारण की, एका प्रकरणामध्ये त्यांना चांगला झटका बसण्याची ही बातमी समोर आली आहे. पुण्यात झालेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमांमध्ये तब्बल 11 लाख रुपये हे अनावश्यक खर्च केल्याने ते पैसे चित्रपट महामंडळाकडे तातडीने जमा करावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये अलका कुबल यांच्यासह प्रिया बेर्डे, प्रकाश सुर्वे विजय पाटकर अलका कुबल प्रिया बेर्डे यांचा समावेश आहे.

2012 मध्ये पुण्यामध्ये मानाचा मुजरा हा कार्यक्रम घेण्यात आला होता. हा कार्यक्रम चित्रपट महामंडळाकडून घेतला होता. या कार्यक्रमासाठी तब्बल 52 लाख रुपये खर्च झाले होते. मात्र, यातील अकरा लाख रुपये अनावश्यक खर्च झाले होते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते, आता उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान या अभिनेत्यांना दणका दिला आहे आणि हे पैसे तातडीने भरण्यास सांगितले आहे.

विशेष म्हणजे ज्या वेळेस सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती, त्यावेळेस अनेकांनी या खर्चाला नापसंती दर्शवली होती. तरी देखील तत्कालीन संचालकांनी हा खर्च केला होता. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले होते. आता या संचालकांना हे पैसे भरावे लागणार आहेत.

Team Beauty Of Maharashtra