बाबो ! अभिनय बेर्डेसोबत दिसणार ‘Bigg Boss 15’ मधील ही ‘बोल्ड’ अभिनेत्री

बाबो ! अभिनय बेर्डेसोबत दिसणार ‘Bigg Boss 15’ मधील ही ‘बोल्ड’ अभिनेत्री

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्याला सोडून जाऊन अनेक वर्षं लोटली आहेत. आता त्यांची आठवण अनेकांना येत असते. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लाडका लेक अभिनय याने देखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काही वर्षांपूर्वी पदार्पण केले.

ती सध्या काय करते या चित्रपटात त्याने अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारली होती. त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतले होते. त्याच बरोबर त्याने अशी ही अशिकी या चित्रपटातील चांगले काम केले होते. त्यानंतर रंपाट या चित्रपटातही त्याने अतिशय जबरदस्त काम केले होते.

आता पुन्हा एकदा तो एका चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे अभिनय बेर्डे आता एका हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अभिनय बेर्डे याची बहिण आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्याच्या तयारीत आहे, तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हिंदीमधील ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोणत चला आम्ही आपल्याला याबाबत माहिती देतो.

ही अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश आहे. तेजस्वी प्रकाश ही आपल्याला बिग बॉस 15 मध्ये नुकतीच दिसली होती. बिग बॉस पंधरा मध्ये तिने अतिशय जबरदस्त असा खेळ केला होता. तिने याआधी देखील अनेक मालिका चित्रपटात काम केलेले आहे. मूळ मराठी असलेल्या तेजस्वी हिने अनेक हिंदी मालिकातही काम केले आहे.

तेजस्वी हिचे संस्कार धरोहर, अपनो की स्वर अंगणी, जोडो के सूर पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तो का आणि त्यानंतर बिग बॉस मधून तिने आपल्या अभिनय कौशल्याची छाप सोडली आहे. आता तेजस्वी प्रकाश ही लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. याबाबतचा एक प्रोमो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

या चित्रपटाचे नाव मन कस्तुरी असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत माने यांनी केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक रोमॅंटिक गाणे आहेत. त्यामुळे आता अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश हे मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. हा चित्रपट अतिशय यशस्वी होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर अभिनय बेर्डे याला देखील या चित्रपट यशस्वी होईल असा विश्वास आहे.

Team Beauty Of Maharashtra