एकांतात आकाश ठोसरशी जवळीक साधणारी ‘ती’ कोण?

एकांतात आकाश ठोसरशी जवळीक साधणारी ‘ती’ कोण?

प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा परशा म्हणजेच आकाश ठोसर दिसत आहे. तसेच आर्चीची म्हणजेच रिंकू राजगुरूची भूमिका ही चिञपटात आहे. या चित्रपटांमध्ये अनेक पैलू दाखवण्यात आलेले आहेत.

त्यामुळे या चित्रपटातून नागराज मंजुळेसह अनेकांना अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यासोबत नागराज हा पहिल्यांदाच काम करत आहे. त्यामुळे हा चित्रपट लोकप्रिय होणार यात शंका नाही. कारण की या चित्रपटाला अनेकांनी चांगल्या पद्धतीने रेटिंग देखील दिली आहे.

नागराज मंजुळे यांनी अतिशय खडतर परिस्थितीमधे आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. पिस्तुल्या हा लघुपट तयार केल्यानंतर त्यांच्याकडे अपेक्षेने पाहण्यात आले. या लघुपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यानंतर फॅन्ड्री हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी केला. फॅन्ड्री हा चित्रपटात वंचित घटकांची कथा दाखवण्यात आली.

त्यानंतर त्यांच्या सैराट या चित्रपटाने अफाट यश मिळवले. बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी रुपये मिळवणारा हा चित्रपट होता. हिंदीमध्ये देखील धडक या नावाने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. नागराज यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक भाष्य मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

आता झुंड या चित्रपटामध्ये देखील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची कथा दाखवण्यात आलेली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉल मध्ये यश कसे मिळते, याचा हा चित्रपट आहे. आणि त्याला अमिताभ बच्चन हे पूर्णपणे प्रशिक्षण देतात. यावर आधारित हा चित्रपट आहे मग यामध्ये विनोद आणि इतर भाग देखील आलेले आहेत.

त्यामध्ये आकाश ठोसर, रिंकू राजगुरु, अमिताभ बच्चन, किशोर कदम यांच्यासह अनेकांनी भूमिका केल्या आहेत. तसेच या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिले आहे. अजय अतुल यांचे संगीत म्हणजे अतिशय बहारदार होणार यात काही शंकाच नाही.

आता या चित्रपटात काम करणारा आकाश ठोसर यांचा एक सोशल मीडियावर फोटो वायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तो केस मोकळे सोडून बसलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर एक तरुणी हात फिरवत आहे. मात्र, या तरुणीचा चेहरा हा झाकलेला आहे. त्यामुळे ही तरुणी नेमकी कोण आहे याबबत चर्चा आता सुरू झालेली आहे.

अनेकांनी कमेंट करून आकाशाचा डोक्याला तेल लावत आहेस का? असे म्हटले आहे. मात्र ही तरुणी कोण आहे हे अजून कळू शकले नाही.

Team Beauty Of Maharashtra