समीर धर्माधिकारी नव्हे तर ‘या’ अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एण्ट्री

समीर धर्माधिकारी नव्हे तर ‘या’ अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एण्ट्री

गेल्या काही दिवसांपासून ही भूमिका अभिनेता समीर धर्माधिकारी साकारणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते( aai kuthe kay karte). उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत. संजनाच्या येण्यामुळे अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात वितुष्ट आलं.

परिणामी, ही जोडी विभक्त झाली. त्यामुळे आता संजना आणि अनिरुद्ध सुखाने संसार करत असून अरुंधती मात्र, एकटीने पुढील आयुष्य काढत आहे. परंतु, अरुंधतीचा हाच एकटेपणा दूर करण्यासाठी लवकरच मालिकेत तिच्या मित्राची एण्ट्री होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही भूमिका अभिनेता समीर धर्माधिकारी साकारणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता या भूमिकेवरील पडदा दूर झाला असून नेमक्या कोणत्या कलाकाराची या मालिकेत वर्णी लागली आहे ते समोर आलं आहे.

‘राजश्री मराठी’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अरुंधतीच्या आयुष्यात येणारा नवा मित्र दिसत असून ही भूमिका समीर धर्माधिकारी साकारणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ही भूमिका सावित्री जोती या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेता झळकणार असल्याचं दिसून येत आहे.

लवकरच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीच्या मित्राची म्हणजेच आशुतोष केळकरची एण्ट्री होणार आहे. आशुतोष केळकर हा अरुंधतीच्या कॉलेजचा मित्र असून त्यांची चांगली गट्टी जमणार आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी प्रथम समीर धर्माधिकारी यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, आता या भूमिकेत अभिनेता ओंकार गोवर्धन (Omkar Govardhan) झळकणार आहे.

आशुतोष आणि अरुंधती हे कॉलेजमध्ये शिकले असून २६ वर्षांनंतर त्यांची भेट होणार आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीय आणि खासकरुन संजना- अनिरुद्धची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, आशुतोष केळकर ही भूमिका साकारणार ओंकार गोवर्धन हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्याची सावित्री जोती ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Team Beauty Of Maharashtra