…म्हणून ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील शेखरच होतंय कौतुक..

आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेता मयूर खांडगे याचा या मालिकेतील अभिनय सर्वच प्रेक्षकांना खूपच आवडतो. तो या मालिकेत संजनाचा पहिला पती शेखरची भूमिका साकारतोय. त्याची बोलण्याची स्टाइल, विनोदी ढंगाने टोमणे मारणे, अरुंधतीला बहीण मानून तिला सपोर्ट करणे, अशी चांगली व्यक्तिरेखा तो या मालिकेचा करतोय.
खऱ्या आयुष्यात देखील मयूर हा काहीसा असाच आहे. त्यामुळे प्रेक्षकांसोबतच या मालिकेतील इतर कलाकारांना सुद्धा त्याचे सेटवर वावरणं तसेच त्याच्या बरोबर गप्पा मारणे प्रचंड आवडते. नुकताच या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांनी अभिनेता मयूर खांडगे याच कौतुक करत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यात अभिनेता मिलिंद गवळी म्हणाले, मयूर खांडगे याच्या येण्याने चैतन्य येते. सेटवर तो आला की वातावरणात बदलते. त्याला चिडवायला, त्याला त्रास द्यायला, त्याला सगळ्यांनाच त्रास द्यायला आवडतं. नेहमी हसतमुख आणि सतत काहीतरी घडत असतं तो आजूबाजूला असला की. सीन विषयी चर्चा असते.
त्याला अजून काय काय करता येईल याच मनन चिंतन चालू असत. त्याचे काहीही साधे सरळ सोपे नसते. शेखर तो आला म्हणजे तो भडा भडा भडा भडा बोलणार खूप बोलणार. परत एकदा त्याची वाक्य पण अफलातून गमतीशीर. मजाही येते. आणि तो ती वाक्ये खूप छान पद्धतीने घेतो. त्याच्या बरोबर शूटिंग करत असताना मजा येते.
आई कुठे काय करते सिरीयल मध्ये मयूर खांडगे एकमेव कलाकार आहे की ज्यांनी लेखिका मुग्धा ची वाक्य अनेक वेळा बदलले आहेत, तर त्याने काही काही शब्द त्याच्या मनाची घेतली. ते शब्द नंतर मुग्धा हिने वापरायला सुरुवात केली. त्यातलाच एक भन्नाट शब्द माझ्यासाठी. त्याने पहिल्यांदा वापरला तो म्हणजे, अन्या देशमुख.
त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला, असं म्हणत अभिनेता मिलिंद गवळी यांनी अभिनेता मयूर खांडगे कौतुक केले. तसेच या पोस्ट खाली संजय अभिनेत्री रुपाली भोसलेनेसुद्धा अभिनेता मयूर खांडगे याचे कौतुक केले. या कमेंट मध्ये अभिनेत्री रुपाली भोसले म्हणते की, मयूर खांडगे एक भारदस्त माणूस. स्वत: या भारदस्त असला तरी लहान बाळ आहेस तू. खरच खूप छान अॅक्टर आहेस.
तुझ्या सोबत काम करताना वेगळीच मजा येते आणि वेगळीच एनर्जी असते. तुझा बिटवीन द लाईन पकडणे आणि त्यावर अजून काय काय करता येईल याचा सतत विचार करतो. ते खरंच खूप भारी आहे. त्यामुळे तुझ्या सोबतचा काम करताना मज्जा येते. मला तुझ्या सोबत चा पहिला सीन सुद्धा ठळक आठवतो. त्यावेळेला जी एनर्जी आणि जे स्पिरिट होतं तेच आजही आहे.
तुझ्यासोबत काम करणं ॲक्टर म्हणून तू आहेसच. पण माणूस म्हणून सुद्धा तू कमाल आहेस. तु हवा हवासा वाटतोस. मिलिंद गवळी सर बोलले की, सेटवर एक वेगळी एनर्जी आणि वातावरण असतं जेव्हा तू असतोस, असेही संजना हिने म्हटले आहे.