‘आई कुठे काय करते’ मालिकेत पाहायला मिळणार अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाट,त्यातही येणार आहे मोठा ट्विस्ट

‘आई कुठे काय करते’ मालिकेत पाहायला मिळणार अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाट,त्यातही येणार आहे मोठा ट्विस्ट

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिका रसिकांना भावतेय. मालिका आता रंजक वळणावर आली आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेचा एक खास चाहतावर्ग आहे. मालिकेत दररोज नवनवीन घडामोडी घडत असतात.या मालिकेतील सगळ्याच कलाकारांचा अभिनय रसिकांना भावतोय. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे.मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि अनघाच्या लग्नाची उत्सुकता होती. अभिषेक आणि अनघा विवाहबंधनात अडकणार आहेत.

बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात असून खास संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पुढाकार घेत लग्नाची जय्यत तयारी केली आहे. लग्नाच्या निमित्ताने देशमुख कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. खास डान्स परफॉर्न्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.या संगीत सोहळ्यात देशमुख कुटुंबाने रेट्रो लूक धारण केलाय.

अनिरुद्ध-संजना, अभिषेक-अनघा, माई-अप्पा, यश-गौरी आणि इशाने सदाबहार मराठी गाण्यांवर ठेका धरत संगीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत केली आहे. या संगीत सोहळ्यात आशुतोषही सामील झाला आहे.आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेज मित्र आहे. कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोष यांची भेट झाली आहे. आशुतोषच्या डोळ्यात नेहमी अरुंधतीविषयी प्रेम दिसते. पण त्याने आजपर्यंत कधी तिच्यासमोर बोलून दाखवले नाही.

तसेच या मालिकेचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अभिषेकच्या लग्नातील संगीत सोहळ्यात घरातील सदस्य धमाल डान्स करताना दिसत आहेत. यावेळी आशुतोष आणि अरुंधती एकत्र डान्स करताना दिसत आहे. मात्र या दोघांन एकत्र पाहून अनिरुद्धचा मात्र रागाने तिळपापड झाला आहे.

एकीकडे आनंदाचं जरी वातावरण असलं तरी अनिरुद्धचा तणाव मात्र कायम आहे.अरुंधती आणि आशुतोषमधील ही वाढती मैत्री अनिरुद्धला मात्र खटकते आहे. त्यामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण असताना अनिरुद्ध मात्र अस्वस्थ आहे.लग्नसोहळ्यातही अनेक घडामोडी घडणार असल्यामुळे मालिकेचे यापुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत.

Team Beauty Of Maharashtra