‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ही अभिनेत्री आता यापुढे मालिकेत दिसणार नाही, समोर आले धक्कादायक कारण

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ही अभिनेत्री आता यापुढे मालिकेत दिसणार नाही, समोर आले धक्कादायक कारण

“आई कुठे काय करते” या मालिकेत आता समृद्धी बंगल्यामध्ये म्हणजेच देशमुख कुटुंबीयांकडे सर्वजण एकत्र आले आहे. याचे कारण जरी वेगळे असले तरी समृद्धीमध्ये सर्व देशमुख कुटुंब एकत्र राहत आहेत. अरुंधती अनिरुद्ध यांच्या घटस्फोटानंतर नीलिमा आणि अविनाश आता आप्पा आणि कांचन सोबत राहत आहेत. नीलिमा आणि अविनाश हे आप्पा व कांचनचा लहान मुलगा आणि सून असतात.

ही मालिका आता संजनासाठी अनेक नवीन वळण घेऊन आली आहे. कारण संजना आणि अनिरुद्ध ज्या दिवशी लग्न करतात, त्या दिवशी कांचन म्हणजे आजीचे बीपी शुट होते आणि त्यांना स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले असते. त्यांची तब्येत ठीक झाल्यावर काही दिवस घरात शांतता आणि आजीची काळजी घेण्याचे सांगितलेले असते.

परंतु संजना हा तिचा मूळ स्वभाव सोडत नाही. घरात प्रत्येक गोष्टीवरून वाद करून कटकट करत असते. त्यामुळे अरुंधती अविनाश आणि नीलिमाला घरी राहावयास सांगते. अविनाश या गोष्टीसाठी तयार होतो. निलीमाला हिलाही समृद्धी बंगल्यात वाटा हवा असतो, म्हणून ती देखील होकार देते. परंतु या मालिकेत आता वेगळेच वळण आले आहे. आजीची तब्येत बिघडल्यामुळे आप्पा आता वाटण्या करणार आहेत.

समृद्धी बंगल्याचे दोन्ही भाग होणार असून एक अनिरुद्धला तर दुसरा अरुंधतीला मिळणार आहे. अरुंधतीने समृद्धी बंगल्यात राहावे म्हणून हा प्रयत्न केला जात असावा. कारण अरुंधतीने तिथेच राहावे, असे सगळ्यांना वाटत असते. आजीची हीच इच्छा असते. त्यामुळे आजीची तब्येत बिघडली असावी, असे अरुंधती हिच्या मनात येत असते. आजची तब्येत बिघडल्याचे कारण वेगळेच असते.

संजना आजीला पोलिसात तक्रार करण्याची धमकी देते. अनिरुद्धला अरुंधती जबरदस्ती लग्नासाठी तयार करते. गेल्या काही भागांमध्ये आपण नीलिमा आणि अविनाश यांना सतत पहात आहोत. तसे पाहायला गेले तर अविनाशचे पात्र हे आता सुरु झाले आहे. कारण मालिकेत असे दाखवले होते की, अविनाश हा आपल्या कुटुंबापासून वेगळे राहात असतो.

परंतु अधून-मधून नीलिमा ही सणावाराला निमित्त्याने देशमुख कुटुंबियांमध्ये वावरताना दाखवली आहे. मालिकेत निलीमाचे पात्र हे छोटे आहे. नीलिमा म्हणजेच अभिनेत्री शितल क्षीरसागर ही आता या मालिकेत काही दिवसांसाठी दिसणार नाही. अशी चर्चा होत आहे. कारण शितल क्षिरसागर आता “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे नीलिमा आता काही दिवस ‘आई कुठे काय करते’ मध्ये दिसली नाहीतर काही वेगळे समजू नका. तिला आता नवीन मालिका मिळाली आहे. माझी तुझी रेशीमगाठ मध्ये तिचे काम हे मोठ्या स्वरूपात असणार आहे.

Team Beauty Of Maharashtra