आई-आप्पांना संकटात टाकून अनिरुद्ध पडणार घराबाहेर; पैशांसाठी विकणार स्वत:च्या वाट्याची जागा

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. आई कुठे काय करते या मालिकेत यश लंडनला जाणार आहे. यश याने शॉर्ट फिल्मसाठी नोमिनेशन केले असून तो लंडनला जाणार असतो. यावर सर्व देशमुख कुटुंबीय आनंदी असते.
हा मुलगा काही करेल असं अनिरुद्धला स्वप्नात देखील वाटले नसते. यश सत्यात हे सर्व करून दाखवतो. अरुंधतीचे स्वप्न पूर्ण करणार असे सर्वांसमोर वचन देतो आणि आईला देखील एक उत्कृष्ट गायिका बनवणार आहे, हा तो सर्वांसमोर ठामपणे सांगतो. सर्वांना त्याचा अभिमान वाटतो.
यशला अनिरुद्ध स्वतःचे कार्ड देतो आणि सांगतो की हवे असल्यास यातले पैसे घे. तू परदेशात जात आहेस. तिथे जवळ पैसे असणे गरजेचे आहे. यश म्हणतो. माझ्याकडे पैसे आहेत. त्यांचा जो चाललेला संवाद असतो तो संजना चोरून ऐकते. यावरून अनिरुद्ध व संजनामध्ये यावरून वाद होतो.
त्यावर अनिरुद्ध म्हणतो की, हा तुझा प्रश्न नाही. मी तुला यापूर्वीच सांगितले होते की, माझी मुलं आणि कुटुंबासाठीसाठी मी वाटेल ते करेल. यात तू बोलायचे नाही. उद्या तू निखिल साठी काही केले तर मी तुला एका शब्दाने विचारले तुला चालेल का?, असे बोलून तो रागाने निघून जातो. संजना अचानक गौरीकडे जाते.
तिथे यश आणि गौरीचे बोलणे पुन्हा तिच्या कानावर पडते. यश गौरीला सांगत असतो की, अविनाश काकाला खूप कर्ज झाले होते. ते कर्ज फिटत नव्हते. म्हणून गुंड त्याला मारायला येत होते. वारंवार धमक्या देत होते. काकूलाही अविनाश काकाने मावशीकडे पाठवले आहे. ही गोष्ट जेव्हा आईला कळाली.
तेव्हा आईने समृद्धी बंगल्यातला अर्धा हिस्सा जो आईच्या नावावर आप्पांनी केला आहे, तो तारण म्हणून ठेवून 25 लाख रुपये अविनाश काकाला दिले आहेत, हे सर्व संजना ऐकते. तिथून काहीही न बोलता बाहेर पडते व अरुंधतीला फोन लावून ताबडतोब समृद्धी बंगला म्हणजे देशमुख कुटुंबीयांकडे ये सांगते.
ती आल्यावर तिला ती खूप प्रेमाने वागणूक देत असते. त्यावर सर्वांना लक्षात येते की, संजना काहीतरी वाद घालणार आहे. मग संजना सर्वांना सांगते की, अरुंधतीने राहते घर गहाण टाकले आहे. त्यावर आजीला विश्वास बसत नाही. ती संजनाला ओरडते. परंतु अरुंधती सांगते की, संजना सांगत आहे ते खरे आहे.
तेव्हाच अविनाशला कळते की, वहिनी घर गहाण टाकले आहे. अनिरुद्ध खूप चिडतो,खूप बोलतो. संजनाही बोलते. आजी म्हणते तुला काय गरज होती, हे असे करण्याची. अरुंधती तेव्हा सांगते की अविनाश भाऊजी यांना खूप कर्ज झाले होते. त्यांना धमक्यांचे फोन येत होते. गुंड मारायला येत होते. ते आत्महत्या करण्याच्या विचारात होते.
त्यामुळे मी मदत केली. हा सर्व प्रकार पाहून अविनाश सात दिवसांच्या आत पैसे उभे करून हे घर सोडू असं सर्वांना वचन देतो. तरी ही अनिरुद्ध ऐकत नाही. त्यात संजना तेल ओतत जाते. हा वाद वाढत जातो. आप्पा सर्वांना सांगतात की, अरुंधतीने मला सर्व विचारूनच केले आहे. अभी देखील आईवर म्हणजेच अरुंधती वर नाराज असतो.
पंचवीस वर्ष मी बाबांना मानत होतो. म्हणून तू मला सर्व काही सांगितले नाहीस. मला एकदाही विचारले नाहीस, असे म्हणतो. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की, आजीला आप्पा म्हणतात की, रागवायचं असेल तर माझ्यावर राग कर. आजी म्हणते की, रागवणे याविषयी काही नाही.
पण , अरुंधतीने सर्वांना खरे सांगून हे करायला पाहिजे, होते असे लपवले का? या घरात अनिरुद्धचा हिस्सा आहे, म्हणते. तेवढ्यात अरुंधती तिथे येते. आजी रागाने निघून जात असते. अरुंधती आजीची माफी मागते आणि म्हणते आई माझ्यावर रागवू नका. माझे चुकले. मग आजी तिला जाणीव करून देते की, हे घर तुझ एकटीचा नसून अनिरुद्ध याचही आहे.
इतक्यात अनिरुद्ध आणि संजना येतात. अनिरुद्ध अरुंधतीला काहीही न बोलता निघून जातो. संजना विचारते की, आता कशाला आली आहेस. अनिरुद्ध याचाही हिस्सा गहाण टाकणार आहेस का? आप्पा संजनाला म्हणतात, तिचा असा काही हेतू नाही. संजना म्हणते.
आता कोणावर विश्वास ठेवणे शक्य नाही. तर इकडे अभी अनघाला फोन लावून घडलेला सर्व प्रकार सांगतो. आईने मला विचारले नाही. यावर तो थोडा नाराज असतो. आईने एकदा तरी कोणाला विचारायला हवे, असे म्हणतो. अनघा म्हणते, ताईने म्हणजेच अरुंधतीने आप्पांना विचारले होते ना, ठीक आहे ना. त्यावर अभिषेक म्हणतो की, आप्पांचे वय झाले आहे.
आपा यांना सर्व गोष्टी आता कळत नाहीत. त्यामुळे एकदा तिने सर्वांशी बोलायला हवे होते. अनघा म्हणते की, मी माझ्या वडिलांना सांगून पैशाचीची व्यवस्था करू का? त्यावर अभिषेक नाही असे उत्तर देतो. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये या मालिकेत तर काय होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.