‘मी प्रेग्नन्ट आहे हे समजल्यावर निर्मात्यांनी…’ नेहा धुपियानं केला धक्कादायक खुलासा
अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला अ थर्स्टडे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री नेहा धुपिया हे देखील दिसली आहे. नेहा धुपिया हिने या चित्रपटातील एका अनुभवाचा नुकताच खुलासा केला आहे.
यापूर्वीच्या घटना देखील सांगितल्या आहेत. हा चित्रपट तयार होताना मी गरोदर होते. त्यामुळे मला कशी वर्तणूक मिळाली, हे तिने सांगितले आहे. नेहा धुपिया ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. नेहा धुपिया हिने अंगद बेदी याच्यासोबत लग्न केले आहे. नेहाने या आधी अनेक चित्रपटात काम केले आहे.
नेहा धुपिया हिने काही वर्षांपूर्वी अजय देवगनसोबक चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाचे नाव ‘कयामत सिटी अंडर थ्रेट’ असे होते. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली होती.
या चित्रपटात संजय कपूर आणि अरबाज खान यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. अजय देवगन हा देखील त्यांच्या सोबत असतो. मात्र नंतर तो गैर कृत्य करणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवतो, अशी या चित्रपटात कथा होती. नेहाने अनेक चित्रपटात काम केलेले आहे.
नेहा धुपिया ही पाच महिन्यांची गरोदर आहे. काही दिवसापूर्वी नेहा धुपिया हिने आपल्या पहिल्या प्रेग्नेंसीच्या वेळी काही दिग्दर्शकांनी आपल्यासोबत कशी वागणूक केली, याचा खुलासा केला आहे. तिने आपल्याला आलेले अनेक कटू अनुभव देखील सांगितले. या वेळी नेहा धुपिया म्हणाली की, मी जेव्हा पहिल्यांदा गरोदर होते, त्यावेळेस माझ्याकडे अनेक चित्रपटांचे प्रोजेक्ट होते.
मला गरोदरपणात देखील काम करायचं होतं. मात्र, काही दिग्दर्शक व निर्मात्यांनी मला तू गरोदर असल्याचे सांगत चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. माणसाच्या शरीरामध्ये बदल हे होतच असतात. मात्र याचा अर्थ असा नाही की तो काहीच काम करू शकत नाही. त्यामुळे मला या चित्रपटातून त्यावेळेस काढल्याचे अतिशय वाईट वाटले, असे देखील तिने सांगितले आहे.
नेहा धुपिया ही अ थर्स्टडे या चित्रपटात देखील झळकत आहे. या चित्रपटात तिने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांची देखील भूमिका आहे. यामी गौतम हिने देखील या चित्रपटात जबरदस्त असे काम केले आहे. या चित्रपटातील अनुभवाबाबत नेहा धुपिया म्हणाले की, मी आता तिसऱ्यांदा गरोदर आहे.
याबाबत मी चित्रपटाच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगितले होते. त्यावेळेस चित्रपट निर्मात्यांनी मला सांगितले की, तुला चित्रपटातून आम्ही काही काढणार नाही. तुला जर चित्रपट सोडायचा असेल तर ती तुझी इच्छा असेल. मात्र मी त्यांना सांगितले की, मी पाच महिन्याची गरोदर आहे. त्यावर निर्मात्यांनी माझ्या वाट्याला आलेली भूमिका बदलून टाकली.
मला गरोदर इन्स्पेक्टर महिलेच्या भूमिकेत दाखवण्यात आले. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांचे आभार कसे म्हणावे तेच मला कळत नाही, असे तिने सांगितले आहे.