लक्ष्मीकृपा व धनलाभासाठी घरात ‘या’ ठिकाणी कासवाची मूर्ती ठेवणे ठरते पवित्र? वास्तूतज्ज्ञांच्या टिप्स वाचा

घराचे प्लॅनिंग आणि डिझाइन करताना, रंग, थीम, डेकोर सर्व काही तज्ज्ञांकडून घेण्यावर आपला भर असतो. अर्थात सध्याच्या घराच्या किमती पाहता आपण प्रचंड कष्टाने घेतलेलं घर परफेक्ट असावं असं प्रत्येकाला वाटतं. घराचे डिझाईन करताना वास्तूशास्त्राचे नियम सुद्धा पाळणे महत्त्वाचे ठरते. आज आपण असाच एक वास्तुशास्त्र नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेकांच्या घरात कासवाची मूर्ती असते. काच किंवा धातूंचे कासव घरात नेमके कोणत्या ठिकाणी असावे व त्यामुळे साधारपणे घरावर व घरातील सदस्यांवर काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. दिव्यवास्तु अल्केमी वास्तु कन्सल्टिंगच्या मालक दिव्या छाबरा यांनी यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

दिव्या छाबरा सांगतात की, कासव हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे “आपल्या सर्वांना माहित आहे की भगवान विष्णू जिथे जातात तिथे त्यांच्या मागे लक्ष्मी किंवा संपत्तीची देवी येते. कासव साधारणपणे १२५-१५० वर्षे जगत असल्याने ते दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. अंकशास्त्रज्ञ लविना श्रीमल यांनी देखील अलीकडेच वास्तूनुसार घरात कासवाच्या मूर्तींचे स्थान कुठे असावे याची माहिती दिली आहे.

March 20, 2023 11:00 IST
Follow Us

कासवाच्या मूर्तीबाबत सांगितलेल्या टिप्स
कासवाची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून घराच्या पश्चिम दिशेला ठेवल्यास इच्छापूर्ती होण्यास मदत होऊ शकते. तसेच ही मूर्ती कार्यालयात ठेवल्यास, यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.
ज्यांना संपत्तीच्या स्थिरतेचा त्रास होतो त्यांनी दक्षिण-पश्चिम दिशेला पितळी कासव ठेवणे उत्तम ठरू शकते, उत्तर दिशेला कासवाचे तोंड असावे.
घराच्या दक्षिण-पश्चिम झोनमध्ये पितळी कासव ठेवल्यास, प्रेम व कौटुंबिक सुख लाभू शकते.

पश्चिमेकडे तोंड करून अभ्यासाच्या टेबलावर पितळी कासव ठेवल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
घराच्या मध्यभागी ठेवलेल्या उत्तराभिमुख कासवाची मूर्ती संयम आणि चिकाटी वाढवण्यास मदत करते.

Team BM