9 वर्षापूर्वी अल्लू अर्जुनने केला होता प्रेमविवाह, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाला -रोज वाढत आहे प्रेम

9 वर्षापूर्वी अल्लू अर्जुनने केला होता प्रेमविवाह, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाला -रोज वाढत आहे प्रेम

अर्जुन हा तेलुगु चित्रपटांमधील एक प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या ओळखीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. त्याचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. लोकांना त्यांचे सर्व चित्रपट खूप आवडतात. अल्लू अर्जुन आणि स्नेहाच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. अल्लू अर्जुनने 6 मार्च 2011 रोजी हैदराबादमध्ये स्नेहा रेड्डीसोबत प्रेम विवाह केला होता. अल्लूने जेव्हा स्नेहाला प्रथम पाहिले होते तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. अल्लु अर्जुनची स्नेहा सोबत पहिली भेट ही एका सामान्य मैत्रिणीच्या लग्नादरम्यान झाली होती. अल्लू अर्जुनने जेव्हा स्नेहाला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीसोबत प्रेम विवाह केला. अल्लू अर्जुन आणि स्नेहाच्या लग्नाचे काही फोटोज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.अर्जुनला त्याच्या बर्‍याच चित्रपटांमधील चांगल्या अभिनयामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुनचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. अल्लू अर्जुनच्या वडिलांचे नाव अल्लू अरविंद आहे. अल्लू अर्जुनचे वडील तेलुगु चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. प्रसिद्ध तेलगू अभिनेता चिरंजीवी यांचे पुतणे देखील आहे.

अल्लू अर्जुनने आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात 2003 साली लालकृष्ण राघवेंद्र राव यांच्या गंगोत्री या चित्रपटाद्वारे केली होती. यानंतर 2004 मध्ये रिलीज झालेला ‘आर्य’ हा चित्रपट हा त्यावर्षीचा सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट होता. बातमीनुसार अल्लू अर्जुन एका चित्रपटात काम करण्यासाठी 16 ते 18 कोटी रुपये घेतो.अल्लू अर्जुनने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अगदी कमी वेळात बर्‍याच चित्रपटांत सर्वोत्कृष्ट अभिनय करून नाव कमावले आहे. आजच्या काळात अल्लूकडे जवळपास 100 कोटींचा लक्झरी बंगला आहे. सर्व लोक अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे आणि त्याच्या स्टाईल चे दिवाने आहेत. अल्लू अर्जुनने ज्युबिली हिल्समधील आपले घर प्रसिद्ध इंटिरियर डिझाइनर आमिर आणि हमीदा यांच्या कडुन सजवून घेतले आहे.

अल्लू अर्जुनकडे रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, जग्वार अशी महागडी वाहने आहेत. जग्वार एक्स जे एल त्यांच्या सर्वात महागड्या वाहनांपैकी एक आहे. 2016 मध्ये अल्लू अर्जुन हा गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा दक्षिण अभिनेता होता. अल्लू अर्जुनने आपल्या लग्नाच्या 9 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या बायकोला अभिनंदन करताना म्हंटले आहे की, ‘वेळ खूप वेगाने जात आहे, परंतु जसा जसा वेळ जात आहे तस तसे आपल्यात असलेले प्रेम देखील वाढत आहे’. अल्लू आणि स्नेहा दोन मुलांचे पालक आहेत.

Team Beauty Of Maharastra