६० दिवसांनी उद्या लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? ‘या’ मार्गे होऊ शकता करोडपती

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह वेळोवेळी गोचर करत असतात. काही ग्रहांचा वेग कमी जास्त असल्याने त्याचा प्रभाव सुद्धा कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. जेव्हा एखाद्या राशीच्या गोचर कुंडलीत एकाहून अधिक ग्रह एकत्र येतात तेव्हा त्या ग्रहांच्या युतीने काही राजयोग सुद्धा तयार होत असतात. येत्या मे महिन्यात तब्बल ६० दिवसनांनंतर लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. मे महिन्यात धन व वैभवदाता शुक्र व बुद्धिदाता बुध यांची युती तयार होत आहे. यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. येत्या काळात या राजयोगाने काही राशींच्या भाग्यात अत्यंत सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. या भाग्यवान राशींना नेमक्या कोणत्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो हे जाणून घेऊया…
लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार धनवान?
मिथुन रास (Gemini Zodiac)
मिथुन राशीसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमच्या राशीच्या लग्न भावी राजयोग तयार होत असल्याने आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. या काळात व्यवसायातून प्रगती व उन्नत्ती साध्य होऊ शकते. येत्या काही दिवसात तुम्हाला स्वतःवर खर्च करण्याची इच्छा होऊ शकते. तुमचे सर्व प्लॅन मार्गी लागू शकतात. तुम्हाला येणारा महिना हा प्रेम व नात्यांसाठी सुद्धा शुभ ठरू शकतो. भागीदारीत सुरु यश व परिणामी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्याची शक्यता आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती घेऊन लक्ष्मी नारायण राजयोग येत आहे. हा राजयोग आपल्या राशीच्या धन भावी तयार होत असल्याने येत्या काळात तुम्हाला प्रचंड व अनपेक्षित धनलाभ होण्याचे योग आहेत. नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभू शकते. यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती व पगारवाढीचे सुद्धा संकेत आहेत. येत्या काळात काही कारणास्तव तुम्हाला प्रवासाचे योग तयार होऊ शकतात.
कन्या रास (Virgo Zodiac)
लक्ष्मी नारायण राजयोग हा कन्या राशीच्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानी तयार होत आहे. हे स्थान तुमच्या कार्य व कर्तृत्वाचे मानले जाते . येत्या महिन्याभरात तुम्हाला नव्या नोकरीची संधी लाभू शकते. व्यवसायात सुद्धा प्रगतीची संधी आहे. प्रलंबित कामे वेळीच मार्गी लावून तुम्ही काही काळ कुटुंबासह आनंद अनुभवू शकता. या काळात वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ घेता येऊ शकतो.