रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या पडलं महागात, जाणून घ्या नेमकं काय घडलय

काही वर्षापूर्वी बॉलिवूडची प्रख्यात गायिका नेहा कक्कर ही माताच्या चौकीमध्ये भजन गायची. यासाठी तिला बहीण देखील साथ देत होती. तिने अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये येण्यासाठी स्ट्रगल केले.
मात्र, तिला खूप मेहनत घ्यावी लागली. इंडियन आयडल या स्पर्धेमध्ये ती सध्या जज म्हणून दिसत असते. एकेकाळी याच इंडियन आयडल मध्ये तिला सहभागी होता आले नव्हते. कारण की एक गाणे म्हणल्यानंतर ती या शोमधून बाहेर पडली होती.
त्यानंतर तिने आपला भाऊ टोनी कक्कर याच्यासोबत मिळून ‘मिले हो तुम हमसे’ हा अल्बम केला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. आज बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना तिने आपल्या आवाजाचा साज दिला आहे. दिलबर दिलबर हे रीमिक्स व्हर्जन मधील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरले आहे.
नेहा कक्कर हिच्याकडे आज अलीशान अशा गाड्या आहेत. नेहा कक्करकडे ऑडी क्यू सेवन ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास 70 लाख ते 1 कोटी रुपयांच्या घरामध्ये असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे तिच्याकडे मर्सडीज गाड्यांची रांग असल्याचे देखील सांगण्यात येते.
ती सध्या मुंबईतील ज्या फ्लॅटमध्ये राहते त्या फ्लॅटची किंमत जवळपास 1 कोटी वीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. तिचा हा फ्लॅट वर्सोवा येथे असून हा फ्लॅट थ्री बीएचके आहे. नेहा कक्कर एका शोसाठी जवळपास 25 लाख रुपये आकारत असल्याचे सांगण्यात येते. तसेच ती इंडियन आयडलमध्ये जज देखील आहे.
एका चित्रपटातील एका गाण्यासाठी नेहा कक्कर ही 10 ते 15 लाख रुपये आकारत असल्याचे सांगण्यात येते. नेहा कक्करकडे आज दिमतीला जवळपास 38 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी पाचशे रुपये रोजावर काम करणारी ही गायिका आज कोट्यवधीची मालकीण बनली आहे.
अशी कमाई करण्यासाठी प्रयत्न गरजेचे असतात, त्याशिवाय नशिबाची साथ असावी लागते, असेही तिने म्हटले होते. नेहा कक्कर हिचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती एके ठिकाणी गाडी थांबवून पाचशे रुपयांच्या नोटा वाटताना दिसत आहे. तिच्या तोंडावर मास्क दिसत आहे.
तिने गाडी थांबवल्या थांबल्या अनेक लोकांचा गराडा तिच्यासमोर पडला. ती नोटा वाटत असताना अनेक जण गाडीच्या आत मध्ये हात घालू लागली. त्यामुळे ती मागे सरकली आणि नोटा घेताना पाहून ती खूप अस्वस्थ झाली. काही वेळा नोटा वाटल्यानंतर तिने गाडीची काच लावून तेथून निघून गेली.
हा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मीका हिचा देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, तिने नोटा न वाटताच तेथून पोबारा केला. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली होती.