31 मार्चपासून 7 जूनपर्यंत बुध राहुची अशुभ युती, तीन राशीच्या लोकांना होणार त्रास

31 मार्चपासून 7 जूनपर्यंत बुध राहुची अशुभ युती, तीन राशीच्या लोकांना होणार त्रास

राशीचक्र आणि ग्रहमंडळात रोज उलथापालथ होत असते. कधी या राशीला तर कधी राशीसाठी चांगला योग जुळून येतो. एकाच वेळी काही ग्रहांची शुभ अशुभ स्थिती भोगावी लागते. अनेकदा चांगले योग आणि अशुभ योग एकाच वेळी आपल्या आयुष्यात येतात. त्यामुळे बेरीज वजाबाकी करून आपल्या नशिबी जे येईल त्यास फलश्रुती किंवा आपलं नशिब समजावं. बुध ग्रह सध्या आपली नीच रास असलेल्या मीन राशीत आहे. 31 मार्च रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत 7 जूनपर्यंत राहणार आहे.

मेष राशीत राहु ग्रह आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे राहु आणि बुधाची अशुभ युती तयार होत आहे. त्यामुळे जडत्व योग तयार होणार आहे. तसेच युतीवर शनिची नीच दृष्टी असणार आहे. राहुसोबत एखादा ग्रह आला की, ती त्याच्या विपरीत फळं देतो. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना सावध राहावे लागणार आहे.

वृषभ – या जातकांच्या बाराव्या स्थानात बुध राहु युती तयार होत आहे. या स्थानाला व्यय म्हणजेच खर्चिक स्थान म्हंटलं जातं. त्यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होईल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा आटोक्यात प्रयत्न करा. या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचे शतू यावेळी कट कारस्थान करू शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण यामुळे तुमचे संबंध बिघडू शकतात. सासऱ्याच्या लोकांशी कोणताही व्यवहार करू नका.

कन्या – या राशीच्या अष्टम भावात बुध आणि राहुची युती होत आहे. त्यामुळे अचानकपणे काही घटना घडतील. एखादं मोठं संकट या काळात ओढावू शकते. त्यामुळे सावधपणे ड्रायव्हिंग करावी. त्वचारोग असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा मोठा फटका बसू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित मदत मिळणार आहे.

धनु – या राशीच्या पंचम स्थानात बुध आणि राहुची युती होणार आहे. हे स्थान प्रेम आणि संतान याच्याशी निगडीत आहे. यामुळे या काळात बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. या काळात घेतलेल्या निर्णयाचा भविष्यात हवा तसा फायदा होणार नाही. नवीन काम सुरु करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. मोठ्या भावाबहिणीसोबत वाद होण्याची शक्यता आहे.

Team BM