300 वर्षानंतर तयार झाला नवपंचम राजयोग, मेषसहीत या राशींचं भाग्य बदलणार

300 वर्षानंतर तयार झाला नवपंचम राजयोग, मेषसहीत या राशींचं भाग्य बदलणार

ब्रह्मांडात ग्रहांची इतक्या वेगाने हालचाली होत असतात की शुभ अशुभ योगांची स्थिती एकाच वेळी जुळून येते. त्यामुळे अनेकदा हा योग तर चांगला होता मग त्या ठिकाणी राशीला डोकेदुखी का दाखवत आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ज्योतिषशास्त्रीय फळं हे शुभ योग वजा अशुभ योग यातून जे उरतं ते नशिबी येतं. त्यात वैयक्ति कुंडलीतील ग्रहमानही चांगलं असणं गरजेचं आहे. गोचर कुडंलीनुसार सूर्य, गुरु आणि मंगळाच्या खास स्थितीमुळे नवपंचम राजयोग तयार झाला आहे. शनि उदय आणि मंगळाच्या गोचरामुले 300 वर्षानंतर हा योग तयार झाला आहे. त्यामुळे चार राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.

या राशीच्या जातकांना होणार फायदा
मेष – या राशीच्या जातकांना नवपंचम राजयोग शुभ राहील. या योगामुळे या राशीच्या जातकांची अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. राजकारणाशी निगडीत लोकांना नवपंचम राजयोगामुळे मोठं पद मिळू सकते. नोकरीत बदल करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील आणि मित्रांची उत्तम साथ लाभेल.

मिथुन – या राशीच्या जातकांना नवपंचम राजयोगाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात ग्रहांची साथ मिळेल. पदोन्नती आणि पगारवाढ होऊ शकते. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल राहील. असं असलं तरी पैसा जपून वापरा. कोणालाही उधारी देऊ नका अन्यथा फटका बसू शकतो.

कर्क – या राशीच्या लोकांना नवपंचम राजयोगाचा फायदा होईल. 300 वर्षानंतर तयार होणाऱ्या या योगामुळे काही कठीण कामं पूर्ण होतील. जमिनीशी निगडीत व्यवहार तडीस लागतील. या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदीचा योग आहे. विदेशवारी करण्याचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो.

कन्या – या राशीसाठी नवपंचम राजयोग फलदायी ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षित धनलाभ होऊ शकतो. या काळात नशिबाची जोरदार साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. पार्टनरशिपच्या धंद्यातून चांगला फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे त्याचा चांगला मोबदला तुम्हाला मिळेल. मित्र परिवाराची भेट होण्याची शक्यता आहे.

Team BM