३० वर्षांनी शनीचा कुंभ प्रवेश: ‘या’ ९ राशींवर धनदेवता कुबेराची कृपा; राजयोग अन् लाभच लाभ

३० वर्षांनी शनीचा कुंभ प्रवेश: ‘या’ ९ राशींवर धनदेवता कुबेराची कृपा; राजयोग अन् लाभच लाभ

एप्रिल महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या एका महिन्यात सर्व नवग्रह विद्यमान राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. हा एक अद्भूत योग असून, ही ज्योतिषीय घटना दुर्मिळ असल्याचे सांगितले जात आहे.

नवग्रहांतील न्यायाधीश मानला गेलेला शनी राशी बदल करणार आहे. शनी आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीचे राशीपरिवर्तन अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. शनीच्या गोचराचा केवळ राशींवर नाही, तर जगभरात प्रभाव पाहायला मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.

शनी २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मोठे बदल पाहायला मिळू शकतील. शनीच्या राशीपरिवर्तनामुळे धनु राशीची साडेसाती संपेल आणि मीन राशीची साडेसाती सुरू होईल. तसेच काही राशींची ढिय्या प्रभावातून मुक्तता होईल.

मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचे स्वामित्व शनी देवाकडेच आहे. सुमारे ३० वर्षांनी शनी देव आपलेच दुसरे घर असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर जुलै महिन्यात शनी वक्री होऊन पुन्हा मकर राशीत येईल. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये मार्गी चलानाने मकर राशीतून कुंभेत प्रवेश करेल.

यानंतर थेट अडीच वर्षांनी शनी महाराज मीन राशीत प्रवेश करेल. सन २०२२ मध्ये शनीने कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुभ लाभ मिळू शकतील. कोणत्या राशींवर धनदेवता कुबेराची विशेष कृपा राहू शकेल, ते जाणून घेऊया…

शनीच्या कुंभ प्रवेशाचा मेष राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. शनीचा राशीबदल कुंडलीच्या दहाव्या स्थानी होणार आहे. याचा कर्म, करिअर, नोकरी, व्यवसायावर सकारात्मक परिणाम होऊ शकतील. यामुळे राजयोग तयार होऊ शकेल. तुम्हाला रॉयल्टी मिळू शकते. तुम्ही निवडणूक जिंकू शकता किंवा राजकारणात मोठे पद मिळवू शकता.

शनीचा कुंभ प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीतही राजयोग जुळून येऊ शकेल. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल, त्यात तुम्हाला यश मिळेल.

शनीचा कुंभ प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकतो. शनीचा राशीबदल कुंडलीच्या सप्तम स्थानी होणार आहे. याचा वैवाहिक जीवन, दाम्पत्य जीवन, भागीदारी यांवर चांगले परिणाम पाहायला मिळू शकतील. शनी गोचरमुळे कुंडलीतील केंद्र त्रिकोणात राजयोग जुळून येऊ शकेल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. या काळात तुम्ही राजकारणातही यशस्वी होऊ शकता.

शनीचा कुंभ प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. मेहनतीचे उत्तम फळ या कालावधीत प्राप्त होऊ शकेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये शुभवार्ता मिळू शकतील. भाग्याची चांगली साथ लाभू शकेल. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक होऊ शकेल.

शनीचा कुंभ प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना प्रगतीकारक ठरू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होऊ शकेल. प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतील. आर्थिक आघाडी चांगली राहू शकेल. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. आनंदवार्ता प्राप्त होऊ शकतील.

शनीचा कुंभ प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. शनीचा राशीबदल कुंडलीच्या चतुर्थ स्थानी होणार आहे. याचा सुख-समृद्धी, वाहन तसेच आईकडून काही फायदा होऊ शकतो. शनी गोचरमुळे कुंडलीतील मध्य त्रिकोणात राजयोग जुळून येऊ शकेल. आर्थिक आघाडी सुधारू शकेल. प्रत्येक कामात तुमची कामगिरी उत्तम राहू शकेल.

शनीचा कुंभ प्रवेश धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. शनीचा राशीबदल कुंडलीच्या दुसऱ्या स्थानी होणार आहे. याचा शुभ प्रभाव आर्थिक आघाडी आणि वाणीवर पाहायला मिळेल. आपण व्यवसायात पैसे कमवू शकता. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ असल्याचे सांगितले जात आहे.

शनीचे होणारे राशीपरिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल. अनेकांना या कालावधीत धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. भाग्योदय होऊ शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल. तसेच कार्यक्षेत्रात आपले प्रशंसा होईल. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील.

शनीच्या कुंभ प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. शनीचा राशीबदल कुंडलीच्या अकराव्या स्थानी होणार आहे. यामुळे मिळकतीचे स्रोत वाढू शकतील. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळू शकेल.

शनीचा राशीबदल ज्योतिषीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला असला तरी सदरची माहिती ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. शनीच्या राशीपरिवर्तानाचा तुमच्यावरील प्रभाव जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Team Beauty Of Maharashtra