३० जानेवारीला शनिदेव अस्त होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनि साडेसातीच्या त्रासापासूनही होईल सुटका

३० जानेवारीला शनिदेव अस्त होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनि साडेसातीच्या त्रासापासूनही होईल सुटका

जानेवारी महिन्याच्या ३० तारखेला शनिदेव अस्त होणार आहेत. ज्याचे लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतील. जाणून घेऊया शनिदेवाच्या अस्तामुळे कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल. ज्योतिष शास्त्रानुसार, ३० जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२:०६ ते ६ मार्च २०२३ रात्री ११:३६ पर्यंत शनिदेव अस्त अवस्थेत असतील. यानंतर शनिदेव १७ जून २०२३ रोजी रात्री १०.४८ वाजता वक्री होतील. तर ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.२६ वाजता मार्गी होतील.

‘या’ राशींची शनि साडेसातीपासून होईल सुटका- शनिदेवाच्या या गतीने धनु राशीच्या लोकांना शनि साडेसतीपासून मुक्ती मिळू शकते. यासोबत शनिदेव तुम्हाला धनलाभाची संधी देखील उपलब्ध करून देतील. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

‘या’ राशींना शनिदेवाच्या साडेसाती धैय्या पासून मुक्ती मिळू शकते- शनिदेवाच्या या गतीने तूळ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळू शकते. यासोबतच तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्हाला यावेळी पैसे मिळण्याची देखील शक्यता दिसत आहे.

दुसरीकडे, वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिच्या धैय्याचा प्रभाव सुरू होऊ शकतो. त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिच्या धैय्याचा प्रभाव संपल्यानंतर कर्क राशीच्या लोकांसाठी शनि साडेसती सुरू होऊ शकते.

Team BM