३ स्वामी ग्रहांचे गोचर! ‘या’ ३ मूलांकांना नशिबाची साथ, धनलाभाचे योग; तुमची बर्थडेट काय?

३ स्वामी ग्रहांचे गोचर! ‘या’ ३ मूलांकांना नशिबाची साथ, धनलाभाचे योग; तुमची बर्थडेट काय?

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूलांकाच्या माध्यमातून भविष्यकथन केले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत त्या व्यक्तीच्या मूलांकावरून अंदाज बांधता येऊ शकतात. नवग्रहांना जसे राशींचे स्वामित्व देण्यात आले आहे, तसेच नवग्रहांना मूलांकांचेही स्वामित्व प्रदान करण्यात आले आहे.

नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ७ फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करेल. तर २७ फेब्रुवारीला बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. १३ फेब्रुवारीला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १५ फेब्रुवारीला शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करेल.

त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात १, ५ आणि ६ या मूलांकाचे स्वामी राशी गोचर करणार आहेत. याचा प्रभाव सर्व ९ मूलांकांवर दिसून येऊ शकेल. काही मूलाकांना फायदा होऊ शकेल, तर काही मूलांकांसाठी आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. तुमचा मूलांक कोणता? जाणून घेऊया…

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. जे काम तुम्हाला खूप कठीण वाटत होते, ते प्रयत्नांनंतर लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी असू शकेल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा काळ लाभदायक ठरू शकेल. नोकरदारांचे कार्यालयात कौतुक होऊ शकेल. योग-ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. नशीब साथ देईल. कठीण प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. ग्रहांचे पाठबळ लाभेल. पिकनिक जाण्याच्या योजना आखाल. घरातील वातावरण बदलेल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभ मिळू शकेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील. तंत्रोक्त देवीसुक्ताचे पठण करावे.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे. हाती घेतलेली कामे पूर्ण करावीत. दूरच्या नातेवाईकांमुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शिक्षण, कायदा क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळू शकेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. नोकरी, व्यवसायातील लोकांची कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल. आर्थिक प्रश्न सुटताना दिसतील. घरातील वातावरण शुभ राहील. शुभवार्ताही मिळतील. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना बढती मिळू शकते. यथासंभव गायत्री मंत्राचा जप करणे लाभदायक ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल. बढतीची शक्यता आहे. खाणकामाशी संबंधित कामात यश मिळेल. कपड्यांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांच्या कामात मंदी येऊ शकते. जोडीदाराशी वाद टाळा. शुक्रवारी श्रीसुक्ताचे पठण करणे उपयुक्त ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. राजकीय दृष्ट्या आगामी काळ चांगला ठरू शकेल. आर्थिक व्यवहारात सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अन्यथा, मोठी रक्कम अडकू शकते. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना इच्छित नोकरी मिळू शकते. सासरच्या मंडळींकडून मतभेद होऊ शकतात. प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा पठण लाभदायक ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. तुमच्या क्षमतेच्या फायदा होईल. आर्थिक आणि पदाचा लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. पती-पत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. हा काळ आर्थिकदृष्ट्या लाभदायक राहील. रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. मित्रांशी मतभेद होऊ शकतात. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी खूप समजूतदारपणाची गरज आहे. वैवाहिक जीवनात किरकोळ वादामुळे मन खिन्न होऊ शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. आखलेल्या योजना, रणनीति प्रत्यक्षात येऊ शकेल. थोडा संघर्ष करावा लागेल, परंतु नंतर यश मिळेल. कुटुंबातील इतर सदस्यांच्या वाढत्या अपेक्षा वैवाहिक जीवनात कटुता आणू शकतात. प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूंचे पूजन करावे.

Team BM