२२ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू होणार या लोकप्रिय मालिका !

२२ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू होणार या लोकप्रिय मालिका !

गेल्या दोन वर्षापासून देशातसह राज्यांत कोरोना महामारीने प्रचंड थैमान घातले होते. मात्र, आता या महामारीचा प्रकोप काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता सर्वत्र चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि सर्व व्यवहार देखील आता सुरू झाले आहेत.

आता लोकल आणि रेल्वेगाड्या देखील मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी देशांमध्ये कोरोनाने अतिशय कहर केला होता. त्यावेळेस सगळेच उद्योग धंदे पडले होते. याचा फटका मराठी चित्रपटसृष्टी आणि आणि मालिका क्षेत्रालाही याचा फटका बसला होता.

मात्र, आता बर्‍यापैकी चित्रीकरण हे सुरू झाले आहे. त्यामुळे आता अनेक मालिका आणि चित्रपट देखील सुरू होण्यास सुरूवात झाली आहे. सूर्यवंशी या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शन झाले आहे. मात्र, या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अशा स्थितीत येणाऱ्या काही कालावधी मध्ये आता नव्याने चित्रपट प्रदर्शित केली‌ जाणार यामध्ये कोणालाही शंका नाही.

मात्र, गेल्या दीड वर्षांमध्ये अनेक मालिकांचे चित्रीकरण रखडले होते. त्यामुळे प्रेक्षकांनाही काय पहावे, हे समजत नव्हते. कारण मालिकांचे चित्रीकरण बंद होते. अशा वेळेस मग अनेक मालिकांच्या निर्मात्यांनी आपल्या जुन्या मालिका पुन्हा एकदा नव्याने दाखवायला सुरुवात केली.

यामध्ये आपण ‘होणार सून मी या घरची’, श्रीयुत गंगाधर टिपरे, चार दिवस सासूचे, तू तिथे मी यासारख्या मालिका पुन्हा एकदा पहिल्या मिळाल्या. हा एक त्यावरील उपाय होता. त्यामुळे प्रेक्षक देखील काही प्रमाणात सुखावले होते. त्याचप्रमाणे दूरदर्शन वरील रामायण आणि महाभारत या मालिका देखील पुन्हा नव्याने सुरू झाल्या होत्या.

रामायण आणि महाभारत पाहून देखील प्रेक्षकांना खूप आनंद वाटत होता. आपल्या लहानपणीच्या मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्या असे अनेकांना वाटत होते. आता पुन्हा एकदा याच मालिका नव्याने प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहेत. होय आपण जे ऐकले ते खरे आहे. कारण झीचे चित्ररंग हे चॅनेल पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

या चॅनल वर पुन्हा एकदा स्वराज्य रक्षक संभाजी, जय मल्हार, फू बाई फू यासारख्या मालिका 22 नोव्हेंबरपासून दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे होणार सुन मी या घरची देवमाणूस आणि इतर मालिका देखील या वाहिनीवर लवकरच दाखवण्यात येतील, असे सांगण्यात येते. चिञ रंग ही वाहिनी काही वर्षांपूर्वी सुरू झाली होती.

मात्र, मध्ये बंद करण्यात आली होती. आता पुन्हा ती वाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता जुन्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. तर आपण या जुन्या मालिका पाहण्यास उत्सुक आहात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra