२२ दिवसांनी ‘या’ राशींचे नशिब पालटणार? शनिदेव उदय होताच देणार बक्कळ धनलाभाची संधी

२२ दिवसांनी ‘या’ राशींचे नशिब पालटणार? शनिदेव उदय होताच देणार बक्कळ धनलाभाची संधी

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता मानले गेले आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा शनिदेवाच्या हालचालीत बदल होतो. त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला दिसतो. ९ मार्च रोजी शनिदेव उदयास येणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु अशा ४ राशी आहेत, ज्यासाठी यावेळी लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

वृषभ- शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या संक्रमणात भाग्य आणि कर्माचा स्वामी आहे. त्यामुळे तुमचे भाग्य उजळेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. कामात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. यासोबतच नोकरदार लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. यासोबतच वडिलांसोबतच्या नात्यात गोडवा दिसणार आहे.

सिंह- सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय शुभ आणि फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीपासून सातव्या भावात विराजमान आहेत. यावेळी तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय करत असणाऱ्या लोकांसाठी याकाळात फायदा होऊ शकतो. तसंच याकाळात तुम्ही नवीन काम सुरू करू शकाल.

तूळ- शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीतील चौथ्या आणि पाचव्या घराचा स्वामी शनिदेव विराजमान आहेत. म्हणूनच यावेळी अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसंच यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी सुधारेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. दुसरीकडे, राजकारण आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

मकर- शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी आनंददायी आणि लाभदायक ठरू शकतो. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दुसऱ्या घरात शनिदेवाचा उदय होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या कामात यश मिळेल. यासोबतच रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. दुसरीकडे, ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे.

Team BM