२०२३ मार्चमध्ये ४ मोठे ग्रह करणार उलाढाल; ‘या’ राशींना लग्नाचा योग, लक्ष्मी येऊ शकते दारी

२०२३ मार्चमध्ये ४ मोठे ग्रह करणार उलाढाल; ‘या’ राशींना लग्नाचा योग, लक्ष्मी येऊ शकते दारी

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. ग्रहांचा हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. मार्चमध्ये अशाच ४ ग्रहांच्या हालचालीत काही बदल होणार आहे. त्यानुसार मंगळ ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार तर शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय १५ मार्चला सूर्यदेव मीन राशीत गोचर करणार असून दुसऱ्याच दिवशी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रह बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु यापैकी ३ राशी अशा आहेत, त्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

तूळ राशी – या राशींच्या लोकांसाठी मार्च महिना शुभ ठरू शकतो. या महिन्यात तुमचे प्रमोशनासह पगारवाढीबाबतची चर्चा होऊ शकते. तर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तसंच तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनातील नातेसबंध अधिक चांगले होऊ शकतात. व्यावसायिकांना नफा मिळण्यासह उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अविवाहित असणाऱ्यांना जोडीदार मिळू शकतो. मात्र, या महिन्यात काही व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

कर्क- मार्च महिना कर्क राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. या राशींच्या लोकांना या महिन्यात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्या आणि लोकल व्यापाऱ्यांना देखील चांगला नफा होऊ शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांना मान-सन्मान मिळण्याची शक्यता असून त्यांना काही पदही मिळू शकतात. नशिबाच्या साथीने भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ- मार्च महिना वृषभ राशीसाठी फायदेशीर आणि आनंददायी ठरू शकतो. या महिन्यात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. या महिन्यात तुमची आर्थिक स्थितीही सुधारु शकते आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. करिअर संबंधी उत्कृष्ट संधी मिळू शकतात. समाजात प्रतिष्ठा वाढू शकते. तर या राशीतील अविवाहितांना लग्नाची स्थळ येऊ शकतात. तुम्हाला कोर्टाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

Team BM