२०२३ मध्ये शनिदेव करणार 3 मोठे नक्षत्र बदल! ‘या’ राशींना मिळू शकतो धनलाभ तर ‘या’ राशींना अपार कष्ट

शनि येत्या नववर्षात एकूण तीन वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. शनि जेव्हाही नक्षत्र किंवा राशी परिवर्तन करतात तेव्हा संबंधित रासच नव्हे तर त्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येतो. येत्या नवीन वर्षात सुरुवातीला १७ जानेवारीला शनिचा कुंभ राशीत प्रवेश होणार आहे. सध्या शनिदेव हे धनिष्ठा नक्षत्रात स्थिर आहेत. १८ फेब्रुवारी २०२२ ला शनिने मार्गक्रमण करत धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश घेतला होता. येत्या वर्षभरात शनि कुंभ राशीत स्थिर व मकर राशीत वक्री स्थितीत राहणार असल्याचे ज्योतिष शास्त्र अभ्यासकांनी सांगितले आहे.
शनिचे पहिले नक्षत्र परिवर्तन- ज्योतिष शास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार २०२३ वर्षात पाहिल्याना मार्च महिन्यात १५ तारखेला शनि शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेणार आहे. शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. राहू हा अनपेक्षित घटनांचा कारक मानला जातो तर शनिला न्यायदेवता व कर्मदाता म्हणून ओळखले जाते. जेव्हा राहूच्या नक्षत्रात शनि प्रवेश करेल तेव्हा त्यांचा प्रभाव वृषभ, कर्क, तूळ व मकर राशीवर दिसून येणार आहे. या राशीच्या मंडळींना आपल्या धन व आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्वचेसंबंधित विकारांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच सावध होऊन खबरदारी बाळगणे हिताचे ठरेल.
शनिचे दुसरे नक्षत्र परिवर्तन- मार्च पाठोपाठ शनि थेट ऑक्टोबरमध्ये १५ तारखेला आपले दुसरे नक्षत्र परिवर्तन करणार आहे. १५ ऑक्टोबरला शनि पुन्हा एकदा मूळ धनिष्ठा नक्षत्रात स्थिर होणार आहे. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. शनी व मंगळ हे एकमेकांच्या विरुद्ध ग्रह मानले जातात. यामुळे ओक्टोबर पुढील काही काळात मेष, वृश्चिक व सिंह राशीच्या मंडळींना काही कष्ट सहन करावे लागू शकतात. या काळात विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. जोडीदाराला दुखावणे आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकते.
शनिचे तिसरे नक्षत्र परिवर्तन- ऑक्टोबर नंतर महिन्याभरानेच लगेच २४ नोव्हेंबरला शनिचे तिसरे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. शनि पुन्हा एकदा धनिष्ठा नक्षत्रातून शतभिषा नक्षत्रात परतणार आहे. याकाळात मात्र मकर, कुंभ, वृषभ, तूळ या राशींना कष्टातून मुक्तीचे योग आहेत. अनेकांना धनलाभ व प्रगतीची संधी सुद्धा मिळणार आहे.