200 वर्षानंतर गुरु, शुक्र आणि शनिचा शुभ दृष्टी भेद, 4 राशींना होणार जबरदस्त फायदा

200 वर्षानंतर गुरु, शुक्र आणि शनिचा शुभ दृष्टी भेद, 4 राशींना होणार जबरदस्त फायदा

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला एक पूर्ण दृष्टी मिळाली आहे. जेव्हा एखादा ग्रह एका राशीत बसलेला असतो तेव्हा तो पूर्णपण सातव्या घराकडे पाहतो. सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्राकडे सातवी दृष्टी आहे. शनिकडे सातवीसह तिसरी आणि दहावी दृष्टी आहे. गुरुकडे सातवीसह पाचवी आणि नववी दृष्टी आहे. मंगळाकडे सातवीसह चौथी आणि आठवी दृष्टी आहे. तर राहु-केतुकडे सातवीसह पंचम-नवम दृष्टी आहे. त्यामुळे 200 वर्षानंतर शुभ दृष्टीचा योग जुळून आला आहे.

कोणत्या ग्रहाकडे कशी दृष्टी आहे समजून घ्या
सूर्य- सातवी
चंद्र- सातवी
मंगळ- चौथी, सातवी आणि आठवी
बुध – सातवी
गुरु- पाचवी, सातवी आणि नववी
शुक्र- सातवी
शनि – तिसरी, सातवी आणि दहावी
राहु- पाचवी, सातवी आणि नववी
केतु- पाचवी, सातवी आणि नववी

6 एप्रिलला शुक्र आपली स्वरास असलेल्या वृषभ राशीत आहे. 2 मे पर्यंत शुक्र या राशीत असणार आहे. शुक्र आणि गुरु एकमेकांपासून तिसऱ्या आणि अकराव्या राशीत स्थित आहेत. शनि आणि शुक्र एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या राशीत आहेत. त्यामुळे या स्थितीचा चार राशीच्या लोकांवर चांगला परिणाम दिसून येईल. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

मेष – या राशीच्या जातकांवर गुरु, शुक्र आणि शनिची शुभ दृष्टी आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. प्रॉपर्टी आणि वाहन खरेदीचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

सिंह – या राशीवरही गुरु, शुक्र आणि शनिची शुभ दृष्टी आहे. त्यामुळे जातकांना चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना याची चांगली फळं मिळतील. व्यवसायिकांना त्यांच्या कामात यश मिळेल. आर्थिक प्रश्न सुटतील.

वृश्चिक – या राशीच्या जातकांना गुरु, शुक्र आणि शनिच्या शुभ दृष्टीचा लाभ मिळेल. यावेळी नशिबाची चांगली साथ मिळेल. नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगला काळ आहे.नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदाराची साथ मिळेल.

कुंभ – या राशीच्या जातकांना शुभ दृष्टीचा फायदा होईल. शनिदेव लग्न राशीत स्थित आहेत. त्यामुळे भाग्याची चांगली साथ मिळेल. भौतिक सुखप्राप्ती या काळात होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.

Team BM