२ शत्रू ग्रहांची युती: ‘या’ ७ राशींना ३० दिवस महत्त्वाचे, धनलाभाची संधी; इच्छापूर्तीचा काळ!

२ शत्रू ग्रहांची युती: ‘या’ ७ राशींना ३० दिवस महत्त्वाचे, धनलाभाची संधी; इच्छापूर्तीचा काळ!

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान झाला आहे. कुंभ राशीत शनी विराजमान आहे. १५ मार्चपर्यंत सूर्य कुंभ राशीत असेल. त्यानंतर सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनी शत्रू ग्रह मानले जातात. या दोन शत्रू ग्रहांची युती कुंभ राशीत होत आहे. मात्र, सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश होत असताना शनी अस्तंगत होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अस्तंगत असलेला शनी उदय होईल. सूर्य आणि शनीच्या युतीचा काही राशींना लाभ होऊ शकेल. तर काही राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल.

सूर्य आणि शनि जवळच्या अंशात असल्यामुळे सूर्य-शनि संयोगाचा मुख्य परिणाम मिळेल. याचा सर्व राशींवर परिणाम होईल. कुंभ राशीतील सूर्याचे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश विशेष ठरणारा आहे. तुमच्या राशीवर कुंभ संक्रांतीचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया…

मेष राशीच्या व्यक्तींना हा काळ मनोकामना पूर्ण करणारा ठरू शकेल. तुमच्यातील प्रतिभा लोकांसमोर येऊ शकेल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुकही होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हा काळ खूप फायदेशीर असेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ चांगला ठरु शकेल. सूर्याचे हे गोचर महत्त्वाचे ठरू शकेल. करिअरमध्ये नाव कमावण्याची संधी मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. पदोन्नतीची चांगली संधी असेल. कार्यक्षेत्रात विस्तार होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींना हा काळ मेहनतीचा ठरु शकेल. समाजात स्थान वाढेल. लोकांशी असलेला संपर्क फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये हा काळ मध्यम फलदायी राहील. नशीब तुमच्या सोबत असेल. आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकाल. एकूणच, हे संक्रमण तुमच्यासाठी चांगले असणार आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. सावधगिरीने कृती करावी. प्रतिमा मलिन होऊ नये, याकडे लक्ष द्यावे. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. प्रवास करताना सावधगिरी बाळगणे उपयुक्त ठरू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. तणाव वाढू शकतो. मित्रांशी सावधगिरी बाळगा. गुप्त गोष्टी शेअर करणे टाळा. एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाऊ शकेल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. मानसिक ताण वाढू शकतो.

कन्या राशीच्या व्यक्तींना हा काळ सकारात्मक ठरू शकेल. नोकरीत चांगले परिणाम मिळू शकतात. अधिकाऱ्यांच्या कृपेने प्रभावही वाढेल. विनाकारण होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. यातून लाभही मिळतील. चांगले आर्थिक परिणाम मिळतील. नशिबाची साथ लाभेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना हा काळ लाभदायक ठरू शकेल. आर्थिक नफा होऊ शकेल. धनलाभाचे योग जुळून येतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले व आनंददायी निकाल मिळतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक नात्यात काही तणाव निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिकदृष्ट्या काळ चांगला राहील. कामात चढ-उतार दिसत असले, तरी तुम्ही हुशारीने परिस्थिती हाताळाल.

धनु राशीच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकेल. अनुकूल परिणाम मिळू शकतील. नातेवाइकांशी संबंध ताणले जाऊ शकतात. सरकारी क्षेत्राकडून लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागेल. व्यावसायिक कामात यश मिळेल. मेहनतीच्या जोरावर तुमचा व्यवसाय वाढेल. नवीन लोक भेटतील, जे तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील.

मकर राशीच्या व्यक्तींना हा काळ सकारात्मक ठरू शकेल. या काळात संपत्तीत वाढ होऊ शकते. सकारात्मक विचार ठेवल्यास अनेक फायदे होतील. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. जोडीदाराशी नाते मजबूत होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यामुळे तणावाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. गुंतवणूक किंवा भागीदारी करण्यापूर्वी पैसे कुठे गुंतवत आहात, याचा विचार करा, त्यानंतरच निर्णय घ्या.

कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्यावर विशेष प्रभाव पडेल. दिनचर्या चांगली करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात चढ-उतार येऊ शकेल. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ चांगला असेल. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. जास्तीत जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशीच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. खर्च वाढू शकतील. समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग सुरुवातीला सापडणार नाही. मात्र, त्यानंतर मार्ग सापडू शकेल. परदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. अनावश्यक काळजींमुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकेल. आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. विरोधकांपासून सावध रहा. नियमितपणे ध्यान करा.

Team BM