१८ दिवसांनी शनी अस्त: ‘या’ ४ राशींना ३१ दिवस अत्यंत शुभ; नशिबाची साथ, भाग्योदयाचा काळ!

१८ दिवसांनी शनी अस्त: ‘या’ ४ राशींना ३१ दिवस अत्यंत शुभ; नशिबाची साथ, भाग्योदयाचा काळ!

४ फेब्रुवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. ०६ मार्च रोजी अस्त असलेल्या शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे. १७ जानेवारी रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केलेला शनी अवघ्या १८ दिवसांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अस्तंगत होत आहे.

एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते.

यानुसार, आताच्या घडीला सूर्य मकर राशीत आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि शनी एकमेकांपासून अगदी जवळच्या अंशांवर असतील. सूर्याच्या प्रभावामुळे शनी पृथ्वीवरून दिसणार नाही. तसेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला शनी सूर्यापासून लांबच्या अंशांवर जाईल. त्यामुळे ४ फेब्रुवारी २०२३ ते ०६ मार्च या कालावधीत शनी अस्तंगत राहील.

जानेवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अद्भूत ठरल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात बुध, मंगळ यांचे चलनबदल झाले. तसेच शुक्र, शनी यांचे राशीपरिवर्तन झाले. यातच आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला शनी अस्तंगत होणार आहे.

कुंभ राशीतील प्रवेशानंतर अवघ्या काही दिवसांनी शनीचे अस्त होणे विशेष मानले जात आहे. शनीचे अस्तंगत होणे काही राशींना लाभदायक ठरू शकेल. नेमक्या कोणत्या राशींना शनी अस्तंगत होणे शुभ ठरू शकेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ लाभदायक ठरू शकेल? जाणून घेऊया…

मिथुन राशीच्या व्यक्तींना कुंभ राशीतील शनी अस्त अनुकूल ठरू शकेल. धर्माच्या कामात अधिक रुची राहील. या काळात तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्राची यात्रा करू शकता. तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात थोडे कष्ट करावे लागतील, पण त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील.

कन्या राशीच्या व्यक्तींना कुंभ राशीतील शनी अस्त सकारात्मक ठरू शकेल. जेव्हा शनि किंवा इतर कोणताही ग्रह अस्त होतो तेव्हा तो कमजोर होतो. या काळात शनीचा प्रतिकूल प्रभाव तुमच्यावर कमी राहील. जुन्या कर्जापासून मुक्ती मिळू शकते. शत्रूही कमजोर राहतील. तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवू शकाल.

मकर राशीच्या व्यक्तींना कुंभ राशीतील शनी अस्त अनुकूल ठरू शकेल. शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव अत्यल्प ठरू शकेल. गूढ विज्ञान किंवा ज्योतिष यांसारख्या विषयांबद्दलचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आगामी काळ चांगला ठरू शकेल. मात्र, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मीन राशीच्या व्यक्तींना कुंभ राशीतील शनी अस्त सकारात्मक ठरू शकेल. न्यायालयीन कामांमध्ये व्यस्त राहू शकाल. बचतीच्या योजना यशस्वी ठरू शकतील. तीर्थक्षेत्राची यात्रा करण्याची संधी मिळू शकेल. समस्येचे निराकरण होण्याचा मार्ग सापडू शकेल

Team BM