14 एप्रिलपासून महिनाभरासाठी सूर्य राहुची युती, ग्रहण योगामुळे चार राशींचं वाढणार टेन्शन

14 एप्रिलपासून महिनाभरासाठी सूर्य राहुची युती, ग्रहण योगामुळे चार राशींचं वाढणार टेन्शन

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि सूर्य जेव्हा राहु-केतुच्या संपर्कात येतात तेव्हा ग्रहण योगाची स्थिती निर्माण होते. सूर्य महिनाभरानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करतो. त्यामुळे हे दर सूर्य दर सहा महिन्यांनी आणि चंद्र महिन्यातून दोन या ग्रहांच्या संपर्कात येतो. आता 14 एप्रिल 2023 रोजी राहु आणि सूर्याची युती मेष राशीत होणार आहे. त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात अशुभ योग म्हणून गणला जातो. त्यात शनिची तिसरी दृष्टी सूर्यावर पडणार आहे. त्यामुळे महिना खडतर जाईल. खासकरून 20 एप्रिल ते 28 एप्रिल हा कालावधी त्रासदायक ठरणार आहे.

19 एप्रिल रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह राशीच्या विळख्यात येणार आहे. त्यामुळे ही 22 एप्रिल 2023 पर्यंत असणार आहे. 22 एप्रिल 2023 रोजी चंद्र सकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर चंद्राचं ग्रहण सुटेल, पण सूर्याचं ग्रहण 14 मे पर्यंत राहणार आहे. चला जाणून घेऊयात चार राशींबाबत.

या चार राशींना बसणार फटका
वृषभ – ग्रहण योगाचा अशुभ परिणाम वृषभ राशीच्या जातकांना बसणार आहे. कारण या राशीच्या 12 व्या म्हणजेच व्यय स्थानात ग्रहण योग असणार आहे. त्यामुळे अकारण पैशांची उधलण होईल. तसेच खोटे आरोपही तुमच्यावर लागू शकतात. त्यामुळे सावधपणे पावलं उचला. 20 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान अति महत्त्वाची कामं करू नका. कारण एखादा करार तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो.

कन्या – या राशीच्या अष्टम भावात सूर्य आणि राहुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. विनाकारण डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागू शकतात. तसेच मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतील. हृदयविकाराच्या रुग्णांनी या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. धंद्यात एखादा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या.

वृश्चिक – या राशीच्या षष्टम भावात सूर्य आणि राहुची युती तयार होत आहे. त्यामुळे आजार, शत्रू, भीती, न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता. यासाठी 20 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत काळजी घेणं गरजेचं आहे. हितशत्रू तुमच्यावर डाव साधून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील. न्यायालयीन प्रकरणात काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. त्यामुळे या काळात शांत राहणाच्या जास्तीत जास्त प्रयत्न करा.

कुंभ – या राशींच्या जातकांच्या तिसऱ्या स्थानात राहु आणि सूर्याची युती होईल. त्यामुळे कोणतंही काम करताना सावधगिरी बाळगा. कारण एखादा निर्णय तुमच्या अंगलट येऊ शकतो. व्यवसायात कोणालाही उधार देऊ नका. कारण पैसे परत मिळणं कठीण होईल. वैवाहित जीवनात कलह वाढू शकतात. त्यामुळे जोडीदारासोबत चांगाल संवाद ठेवा. अन्यथा वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Team BM